India vs Bangladesh : युवा ब्रिगेडनं केली बांगलादेशच्या ‘टायगर्स’ची शिकार, भारतानं 30 धावांनी मिळवला मालिका विजय

India vs Bangladesh : युवा ब्रिगेडनं केली बांगलादेशच्या ‘टायगर्स’ची शिकार, भारतानं 30 धावांनी मिळवला मालिका विजय

भारत-बांगलादेश यांच्यात झालेली तीन सामन्यांची टी-20 मालिका टीम इंडियानं 2-1नं आपल्या खिशात घातली.

  • Share this:

नागपूर, 10 नोव्हेंबर: भारत-बांगलादेश यांच्यात झालेली तीन सामन्यांची टी-20 मालिका टीम इंडियानं 2-1नं आपल्या खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात भारतानं 30 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 174 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चाहरच्या माऱ्यापुढे बांगलादेशची फलंदाजी टिकू शकली नाही. दिपक चाहरनं सहा विकेट घेत बांगलादेशच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. त्यामुळं बांगलादेशच्या संघानं 144 धावांपर्यंत मजल मारली.

बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या फळासा आला नाही. श्रेयस अय्यरच्या 62 धावा आणि केएल राहुलच्या 52 धावांच्या जोरावर भारतानं 174 धावांचे आव्हान ठेवले. बांगलादेशला चांगली सुरुवात करता आली नाही. दुसऱ्याच ओव्हरला दोन चेंडूवर दीपक चाहरनं लिंटन दास आणि सौम्य सरकारला बाद केले. मात्र त्याला हॅट्रिक कामगिरी करता आली नाही. मोहम्मद नैमनं 48 धावांची 81 खेळी करत कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मात्र 15व्या ओव्हरमध्ये शिवम दुबेनं त्याला माघारी धाडले. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर अफीफ हुसेनही बाद झाला. भारताकडून दिपक चाहरनं सहा, शिवम दुबे तीन तर, चहलनं एक विकेट घेतली.

तत्पूर्वी बांगलादेशनं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी दुसऱ्या टी-20 सामन्यात 82 धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला शफिऊल इस्लाम 2 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर शफिऊलनेच शिखर धवनही 19 धावांवर बाद केले. त्यानंतर श्रेयस आणि राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. राहुल बाद झाल्यानंतर श्रेयसनं बांगलादेशच्या गोलंदाजांची शाळा घेण्यास सुरुवात केली.

या सामन्यात श्रेयसनं 5 षटकारांच्या मदतीनं आपलं पहिलं अर्धशतक केवळ 27 चेंडूत पूर्ण केलं. मात्र श्रेयसला शेवटपर्यंत फलंदाजी करता आली नाही तो, 33 चेंडूत 62 करत बाद झाला. त्याआधी राहुलनं टी-20मधले सहावे अर्धशतक पूर्ण केले. मात्र राहुलही 35 चेंडूत 52 धावा करत बाद झाला.

अफिफ हुसेनच्या 15व्या ओव्हरमध्ये श्रेयसनं 3 षटकार लगावले. तर, ऋषभ पंतला या सामन्यातही चांगली कामगिरी करू शकला नाही. सौम्य सरकारनं 6 धावांवर पंतला क्लिन बोल्ड केले. मनीष पांडे आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांत आक्रमक फलंदाजी करत भारताला 174 धावांपर्यंत पोहचवले. बांगलादेशकडून शाफिकुल इस्लाम आणि सौम्य सरकारनं यांनी 2 तर, अमीन हुसेननं 1 विकेट घेतली.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मनीष पांडे, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, यजुर्वेद्र चहल, खलिल अहमद.

बांगलादेश : मदमुदुल्ला रियाद (कर्णधार), तैजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुशफिकर रहिम, अफिफ हुसैन, मोसादीक हुसेन सैकत, अमिनूल इस्लाम, अराफत सन्नी, अबू हैदर, अल-अमिन हुसैन, मुस्तफिझूर रेहमान, शफिऊल इस्लाम.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2019 06:33 PM IST

ताज्या बातम्या