India vs Bangladesh : रोहित देणार 'या' मुंबईकर खेळाडूला संघात जागा, दुसऱ्या टी-20 सामन्यात होणार बदल

भारत-बांगलादेश यांच्यात दुसरा टी-20 सामना 7 नोव्हेंबर रोजी राजकोट येथे होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 05:08 PM IST

India vs Bangladesh : रोहित देणार 'या' मुंबईकर खेळाडूला संघात जागा, दुसऱ्या टी-20 सामन्यात होणार बदल

राजकोट, 06 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात दुसरा टी-20 सामना 7 नोव्हेंबर रोजी राजकोट येथे होणार आहे. दरम्यान याआधी रोहित शर्मानं जलद गोलंदाजीमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे संकेत दिले. तसेच, शिखर धवनच्या फॉर्मबाबतही रोहितनं सांगितले.

पहिल्या टी-20 सामन्यात भारताला केवळ 148 धावा करता आल्या. हे आव्हान बांगलादेशच्या संघानं 19व्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. पहिल्या टी-20 सामन्यात एकाही युवा खेळाडूला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्याचबरोबर गोलंदाजांनाही बांगलादेशच्या फलंदाजांना रोखता आले नाही. त्यामुळं बांगलादेशनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0नं आघाडी मिळवली आहे.

दरम्यान आज झालेल्या पत्रकारांशी बोलताना रोहित शर्मानं झालेल्या चूका मान्य केल्या पण फलंदाजीचे कौतुकही केले. यावेळी रोहितनं, “आमची फलंदाजी चांगली आहे त्यामुळं मला वाटत नाही काही विशेष बदल करावे लागतील. मात्र राजकोटमधल्या मैदानानुसार आणि पीचनुसार काही बदल नक्की करता येतील”, असे सांगितले.

वाचा-दुसरा टी-20 सामना रोहितसाठी ठरणार खास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय

तसेच, दुसऱ्या टी-२० सामन्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरला संघात जागा मिळू शकते. खलिल अहमदने पहिल्या टी-20 सामन्यात स्वैर मारा केला होता. त्यामुळं खलिलच्या जागी शार्दुलला संघात जागा मिळू शकते. गोलंदाजीमध्ये कोणते बदल केले जाणार याबाबत विचारले असता रोहितनं, “पहिल्या सामन्यात दिल्लीच्या पिचनुसार आम्ही गोलंदाजांना संघात जागा दिली होती. दरम्यान राजकोटमध्ये पिचनुसार गोलंदाजीमध्ये बदल होऊ शकतात”, असे सांगत शार्दुल ठाकुरबाबत संकेत दिले आहेत.

Loading...

‘महा’ चक्रीवादळामुळं होऊ शकतो सामना रद्द

‘महा’ चक्रीवादळामुळं राजकोट येथे खेळवण्यात येणारा दुसरा टी-20 सामना संकटात आहे. अतितीव्र चक्रीवादळात रुपांतरित झालेलं महा हे वादळ हळूहळू गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकू शकतं. अरबी समुद्रातलं हे वादळ किनारपट्टीच्या दिशेनं आलं तर त्याचे परिणाम संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला जाणवू शकतील, असा अंदात भारतीय हवामान विभागाने IMD नोंदवला आहे. गुजरातला याचा मोठा फटका बसणार आहे. अरबी समुद्रात आलेले हे वादळ बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर येणार आहे. 6 नोव्हेंबरला मध्यरात्री किंवा 7 नोव्हेंबरला पहाटे हे वादळ गुजरात किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या प्रभावाने ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहतील. 120 किमी प्रतितास पर्यंत वादळाचा जोर वाढू शकतो. या संपूर्ण काळात समुद्र खवळलेला असेल. पुढचे तीन दिवस समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

वाचा-‘खेळ नाहीतर...’, दिग्गज क्रिकेटपटूनं धवनला दिली धमकी

सामना नाही झाला तर भारताला गमवावी लागेल मालिका

भारतीय संघाला नवी दिल्लीमध्ये झालेला पहिला सामना 7 विकेटनं गमवावा लागला. त्यामुळं भारताला दुसऱ्या सामन्याकडून जास्त अपेक्षा आहे. त्यामुळं 7 नोव्हेंबरला खेळवल्या सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास हा सामना रद्द होऊ शकतो. परिणामी भारताला मालिका गमवावी लागे. भारत-बांगलादेश यांच्यातील अंतिम सामना 10 नोव्हेंबरला नागपूर येथे होणार आहे. या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यास ही मालिका बरोबरीत सुटेल.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, यजुर्वेद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, ऋषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर.

वाचा-RCBच्या तिजोरीत खडखडाट, IPL लिलावात बसणार मोठा झटका

पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...