india vs Bangladesh : बॉस, तुला एवढंही कळत नाही का? पत्रकार परिषदेत रोहितचा 'विराट' अवतार

नेहमी कुल असणाऱ्या रोहितला नक्की झालय काय?

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 02:56 PM IST

india vs Bangladesh : बॉस, तुला एवढंही कळत नाही का? पत्रकार परिषदेत रोहितचा 'विराट' अवतार

राजकोट, 07 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात राजकोटमध्ये आज दुसरा टी-20 सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर भारतासाठी हा सामना करो वा मरो असणार आहे. मात्र,पहिल्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा काहीसा दबावात असल्याचे चित्र दिसत आहे. कारण नेहमी शांत असणारा रोहित पहिल्या सामन्यातही रागात दिसला. असाच काहीसा प्रकार भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या सामन्याआधी घडला.

भआरत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेच रोहितनं पत्रकारांवर राग काढला. रोहितनं रागात एका पत्रकारावर राग काढला. पत्रकार परिषदेत प्रश्न-उत्तरे सुरू असताना एका पत्रकारांच्या फोन वाजला. त्यावर रोहितनं रागानं फोन सायलेंटवर ठेवत जा, असे सांगितले.

दुसरीकडे पहिल्या टी-20 सामन्यात भारताला केवळ 148 धावा करता आल्या. हे आव्हान बांगलादेशच्या संघानं 19व्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. पहिल्या टी-20 सामन्यात एकाही युवा खेळाडूला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्याचबरोबर गोलंदाजांनाही बांगलादेशच्या फलंदाजांना रोखता आले नाही. त्यामुळं बांगलादेशनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0नं आघाडी मिळवली आहे.

वाचा-अनिल कुंबळेचा वारसदार; 15व्या वर्षीच केली 'परफेक्ट 10'ची कामगिरी!

संघात होऊ शकतात काही बदल

Loading...

पत्रकारांशी बोलताना रोहित शर्मानं झालेल्या चूका मान्य केल्या पण फलंदाजीचे कौतुकही केले. यावेळी रोहितनं, “आमची फलंदाजी चांगली आहे त्यामुळं मला वाटत नाही काही विशेष बदल करावे लागतील. मात्र राजकोटमधल्या मैदानानुसार आणि पीचनुसार काही बदल नक्की करता येतील”, असे सांगितले. तसेच, दुसऱ्या टी-२० सामन्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरला संघात जागा मिळू शकते. खलिल अहमदने पहिल्या टी-20 सामन्यात स्वैर मारा केला होता. त्यामुळं खलिलच्या जागी शार्दुलला संघात जागा मिळू शकते. गोलंदाजीमध्ये कोणते बदल केले जाणार याबाबत विचारले असता रोहितनं, “पहिल्या सामन्यात दिल्लीच्या पिचनुसार आम्ही गोलंदाजांना संघात जागा दिली होती. दरम्यान राजकोटमध्ये पिचनुसार गोलंदाजीमध्ये बदल होऊ शकतात”, असे सांगत शार्दुल ठाकुरबाबत संकेत दिले आहेत.

वाचा-'धवनला बाहेर काढा आणि केएल राहुलला खेळवा', दिग्गज क्रिकेटपटू भडकला

रोहित आज करणार शतकी कामगिरी

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा राजकोटमध्ये बांगलादेशविरोधात मैदानात उतरताच एक रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे. 7 नोव्हेंबरला होणाऱ्या टी-20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहित शर्मा 100वा सामना खेळणार आहे. 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू असणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित दुसरा खेळाडू आहे.

वाचा-मॅच फिक्सिंग, विराटच्या संघातील खेळाडूसह तिघांना अटक

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, यजुर्वेद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, ऋषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 02:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...