India vs Bangladesh : दुसरा टी-20 सामना रोहितसाठी ठरणार खास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय

भारत-बांगलादेश यांच्यात दुसरा टी-20 सामना राजकोट येथे होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 04:02 PM IST

India vs Bangladesh : दुसरा टी-20 सामना रोहितसाठी ठरणार खास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय

राजकोट, 06 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात दुसरा टी-20 सामना राजकोट येथे होणार आहे. 7 नोव्हेंबरला हा सामना होणार असून भारताकडे टी-20 मालिकेत बरोबरी करण्याची संधी असणार आहे. नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा झटका बसला होता. या सामन्यात फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र रोहितकडे दुसऱ्या कसोटी सामन्यात विक्रम करण्याची संधी असणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा राजकोटमध्ये बांगलादेशविरोधात मैदानात उतरताच एक रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे. 7 नोव्हेंबरला होणाऱ्या टी-20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहित शर्मा 100वा सामना खेळणार आहे. 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू असणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित दुसरा खेळाडू आहे.

100वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणारा रोहित शर्मा जगातला दुसरा खेळाडू ठरणार आहे. पाकिस्तानचा ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 111 सामने खेळले आहेत. त्यानंतर रोहित शर्मा आणि शाहिद आफ्रिदी यांचा क्रमांक लागतो. या दोन्ही खेळाडूंनी 99 सामने खेळले आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात रोहितनं 99वा सामना खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 98 सामने खेळणाऱ्या धोनीला मागे टाकले होते.

वाचा-‘खेळ नाहीतर...’, दिग्गज क्रिकेटपटूनं धवनला दिली धमकी

कोणत्या भारतीय खेळाडूंनी किती सामने खेळले आहेत.

Loading...

भारतीय खेळाडूंच्या रेकॉर्डबाबत बोलायचे झाल्यास रोहित शर्मा (99), धोनी (98) सामने खेळले आहेत. त्यानंतर सुरेश रैना (78) आणि विराट कोहली (72) यांचा क्रमांक लागतो. तर या यादीत युवराज सिंग (57), आणि शिखर धवन (56) यांचाही समावेश आहे.

वाचा-RCBच्या तिजोरीत खडखडाट, IPL लिलावात बसणार मोठा झटका

रोहितचा टी-20 रेकॉर्ड

रोहित शर्मानं आतापर्यंत 99 टी-20 सामने खेळले आहेत. यात रोहितनं 2452 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा रोहित फलंदाज आहे. रोहितच्या मागे या यादीत विराट कोहलीचा क्रमांक आहे. त्यानं 72 सामन्यात 2450 धावा केल्या आहेत. तर, रोहित शर्माच्या नावावर सर्वात जास्त षटकारांचाही विक्रम आहे. रोहितनं 106 षटकार लगावले आहेत.

वाचा-आता IPLमधली राडेबाजी होणार बंद, BCCIनं घेतला मोठा निर्णय

पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...