India vs Bangladesh : युवराजचा रेकॉर्ड तोडण्यासाठी रोहितचा तयार होता मास्टरप्लॅन पण...

India vs Bangladesh : युवराजचा रेकॉर्ड तोडण्यासाठी रोहितचा तयार होता मास्टरप्लॅन पण...

एका चेंडूत बदलले रोहितचे मन, काय होता नक्की रोहितचा प्लॅन?

  • Share this:

राजकोट, 08 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 8 विकेटनं विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं शानदार खेळी. रोहित शर्माच्या खेळीच्या जोरावर भारतानं सामना जिंकला. रोहितनं या सामन्यात 43 चेंडूत 85 धावा केल्या. यात चार चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

दरम्यान, सामन्यानंतर रोहितनं मोसाद्देक हुसेनच्या चेंडूवर तीन षटकार मारल्यानंतर काय प्लॅन होता ते सांगितले. युझवेंद्र चहलनं रोहित शर्माच्या घेतलेल्या मुलाखतीत, “मी जेव्हा तीन चेंडूवर तीन षटकार मारले. तेव्हा पुढच्या तीन चेंडूवरही षटकार मारायचे होते. पण चौथा चेंडू मिस झाला आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर एक रन काढला", असे सांगितले.

रोहित बांगलादेश विरोधात युवराज सिंगचा सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम तोडण्याच्या तयारीत होता. यासाठी रोहितनं मनाची तयारीही केली होती. मात्र तीन चेंडूत तीन षटकार मारू शकला नाही. युवराजनं 2007मध्ये टी-20 वर्ल्ड कप दरम्यान दक्षिण आफ्रिका विरोधात ही कामगिरी केली होती. मात्र रोहितला आपल्या 100व्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात या विक्रमाची संधी होती. मात्र त्याला ही कामगिरी करता आली नाही.

वाचा-पंतच्या ‘त्या’ स्टम्पिंगवर रोहितनं चक्क तिसऱ्या पंचांना घातली शिवी, VIDEO VIRAL

वाचा-फलंदाज होता आऊट पण पंतच्या एका चुकीमुळं NOT OUT, पाहा लाजिरवाणा VIDEO

पहिल्या टी20 सामन्यातील पराभवानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा आणि निर्णायक सामना 10 नोव्हेंबरला नागपुरमध्ये होणार आहे.

वाचा-जबरा फॅन! लग्न सोडून होणाऱ्या बायकोसोबत बघत बसला मॅच, PHOTO VIRAL

सऱ्या सामन्यात भारतानं दमदार कमबॅक केला. बांगलादेशनं दिलेले 154 धावांचे आव्हान भारतानं 16 ओव्हरमध्ये पार केले. पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं 8 विकेटनं जिंकला. यात रोहित शर्मानं दमदार 85 धावांची दमदार खेळी केली. रोहित आपला 100वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळत होता, याच सामन्यात फक्त 23 चेंडूत रोहितनं अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2019 01:52 PM IST

ताज्या बातम्या