India vs Bangladesh : मध्यरात्री राजकोटमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, असे असेल आजचे हवामान

भारतासाठी 'महा' धोका, करो वा मरोचा सामना होणार की नाही?

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 03:27 PM IST

India vs Bangladesh : मध्यरात्री राजकोटमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, असे असेल आजचे हवामान

राजकोट,07 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज राजकोट येथे होणार आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव मिळाल्यानंतर आजचा सामना भारतासाठी करो वा मरो असणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे. मात्र भारतासाठी धोकादायक ठरत आहे ते ‘महा’ चक्रीवादळ.

बुधवारी मध्यरात्री राजकोटमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली त्यामुळं मैदानाता पाण्याचे तळे झाले होते. असे असताना सकाळी रोहित शर्मानं खेळपट्टीची पाहणी केली. दरम्यान हे चक्रीवादळ सौराष्ट्राकडे कुच करत असताना काही प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र हवमान खात्याच्या अंदाजानुसार सात वाजता सामना सुरू होणार आहे. यावेळेस वातावरण ढगाळ असण्याती शक्यता आहे. त्यामुळं संध्याकाळपर्यंत महाचक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ शकते.

वाचा-बॉस, तुला एवढंही कळत नाही का? पत्रकार परिषदेत रोहितचा 'विराट' अवतार

असे असेल हवामान

राजकोटमध्ये आज दुपारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र राजकोटमधील ड्रेनिज सिस्टिम चांगली असल्यामुळं काही तास आधी पाऊस थांबला तर सामना होऊ शकतो. मात्र आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. तर, सायंकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळं चक्रीवादळामुळं सामना रद्द झाल्यास भारताला ही मालिका गमवावी लागले. महा चक्रीवादळ पोरबंदरपासून 400 किमी दूर आहे.

Loading...

वाचा-रोहित देणार 'या' मुंबईकर खेळाडूला संघात जागा, दुसऱ्या टी-20 सामन्यात होणार बदल

सामना नाही झाला तर भारताला गमवावी लागेल मालिका

भारतीय संघाला नवी दिल्लीमध्ये झालेला पहिला सामना 7 विकेटनं गमवावा लागला. त्यामुळं भारताला दुसऱ्या सामन्याकडून जास्त अपेक्षा आहे. त्यामुळं 7 नोव्हेंबरला खेळवल्या सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास हा सामना रद्द होऊ शकतो. परिणामी भारताला मालिका गमवावी लागे. भारत-बांगलादेश यांच्यातील अंतिम सामना 10 नोव्हेंबरला नागपूर येथे होणार आहे. या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यास ही मालिका बरोबरीत सुटेल.

वाचा-दुसरा टी-20 सामना रोहितसाठी ठरणार खास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय

असा असेल भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यजुर्वेद्र चहल, दीपक चहर, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पांडय़ा, ऋषभ पंत, लोकेश राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...