India vs Bangladesh : ‘आम्ही बेकार नाही बसलोय, मालिका आमचीच'; बांगलादेशचं भारताला ओपन चॅलेंज!

India vs Bangladesh : ‘आम्ही बेकार नाही बसलोय, मालिका आमचीच'; बांगलादेशचं भारताला ओपन चॅलेंज!

बांगलादेश मालिका विजयासाठी सज्ज. भारताला देणार कडवे आव्हान.

  • Share this:

राजकोट, 07 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात दुसरा टी-20 सामना आज होत आहे. बांगलादेशच्या संघानं पहिला सामना जिंकत चांगली सुरुवात केली आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज राजकोट येथे 7 वाजता होणार आहे. बांगलादेश संघानं पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0नं आघाडी घेतली आहे. त्यामुळं मालिका विजयासाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. दरम्यान सामन्याआधी बांगलादेशच्या कर्णधारानं भारतीय संघाला आव्हान दिले आहे.

बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाहने (Mahmudullah) दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ विजय मिळवले अशी आशा व्यक्त केली आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारताला केवळ 148 धावा करता आल्या. हे आव्हान बांगलादेशच्या संघानं 19व्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी करत भारताविरोधात 10 वर्षांनी विजय मिळवला.

वाचा-मध्यरात्री राजकोटमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, असे असेल आजचे हवामान

‘आम्ही बेकार नाही बसलो आहोत, पूर्ण तयारी आहे’

सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत महमदुल्लाहनं संघावर आत्मविश्वास दाखवला. बांगलादेशच्या कर्णधारानं, “राजकोटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. भारतीय संघ तगडा आहे त्यामुळं पहिल्या चेंडूपासून आम्हाला चांगली कामगिरी करावी लागले. पहिला सामना जिंकल्यामुळं खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. चांगल्या कामगिरीसाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही बेकार बसलो नाही आहोत, सामना जिंकण्यासाठी सज्ज आहोत”, असे सांगितले.

बांगलादेशचा मास्टरप्लॅन

महमदुल्लाहने (Mahmudullah) आम्ही पूर्ण तयारी केली आहे, असे सांगत, 'टी-20मध्ये जर तुम्हाला चांगले पीच मिळाले आणि टॉस तुमच्या बाजूनं असेल तर फायदा होतो. टी-20मध्ये एकच प्लॅन असतो की तुम्हाला वेळोवेळी खेळ बदलता आला पाहिजे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली पाहिजे. पण भारताला पराभूत करण्यासाठी सज्ज आहोत”, असे म्हणत टीम इंडियाला आव्हान दिले.

वाचा-बॉस, तुला एवढंही कळत नाही का? पत्रकार परिषदेत रोहितचा 'विराट' अवतार

मुशफिकुर, महमदुल्लावर बांगलादेशची मदार

शाकिब-अल-हसनच्या अनुपस्थितीत बांगलादेश संघानं शानदार कामगिरी करत मालिकेत विजयी आघडी मिळवली. कर्णधार महमदुल्ला रियादच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने भारताला कडवे आव्हान देत विजय मिळवला. संघाची भिस्त ही रहिम आणि सौम्य सरकार यांच्यावर असणार आहे. तर गोलंदाजीत इस्लाम व हुसैन या फिरकी जोडीवर त्यांची मदार आहे.

भारतीय संघात होऊ शकतात महत्त्वाचे बदल

पत्रकारांशी बोलताना रोहित शर्मानं झालेल्या चूका मान्य केल्या पण फलंदाजीचे कौतुकही केले. यावेळी रोहितनं, “आमची फलंदाजी चांगली आहे त्यामुळं मला वाटत नाही काही विशेष बदल करावे लागतील. मात्र राजकोटमधल्या मैदानानुसार आणि पीचनुसार काही बदल नक्की करता येतील”, असे सांगितले. तसेच, दुसऱ्या टी-२० सामन्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरला संघात जागा मिळू शकते. खलिल अहमदने पहिल्या टी-20 सामन्यात स्वैर मारा केला होता. त्यामुळं खलिलच्या जागी शार्दुलला संघात जागा मिळू शकते. गोलंदाजीमध्ये कोणते बदल केले जाणार याबाबत विचारले असता रोहितनं, “पहिल्या सामन्यात दिल्लीच्या पिचनुसार आम्ही गोलंदाजांना संघात जागा दिली होती. दरम्यान राजकोटमध्ये पिचनुसार गोलंदाजीमध्ये बदल होऊ शकतात”, असे सांगत शार्दुल ठाकुरबाबत संकेत दिले आहेत.

वाचा-रोहित देणार 'या' मुंबईकर खेळाडूला संघात जागा, दुसऱ्या टी-20 सामन्यात होणार बदल

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, राहुल चहर, यजुर्वेद्र चहल, संजू सॅमसन, खलिल अहमद.

बांगलादेश : महमदुल्ला रियाद (कर्णधार), तैजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुशफिकर रहिम, अफिफ हुसैन, मोसादीक हुसेन सैकत, अमिनूल इस्लाम, अराफत सन्नी, अबू हैदर, अल-अमिन हुसैन, मुस्तफिझूर रेहमान, शफिऊल इस्लाम.

First published: November 7, 2019, 5:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading