VIDEO : 100, 150 मग 200 आणि..., विराट-मयंकमध्ये रंगला ड्रेसिंग रूममधून संवाद

VIDEO : 100, 150 मग 200 आणि..., विराट-मयंकमध्ये रंगला ड्रेसिंग रूममधून संवाद

ड्रेसिंग रूम ते मैदान असा रंगला मयंक आणि विराटमध्ये द्विशतकाचा संवाद.

  • Share this:

इंदूर, 15 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना इंदूरमधील होळकर मैदानावर होत आहे. यात दुसऱ्या दिवशी सलामीला आलेल्या मयंक अग्रवालनं दुहेरी शतकाची विक्रमी कामगिरी केली. मात्र मयंक अग्रवालनं 150 धावा पूर्ण केल्यानंतर विराट कोहलीनं मयंकला 200 करण्याचा इशारा दिला. मयंकनं ही कामगिरीही करून दाखवली. मयंकने 330 चेंडूत 28 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 243 धावा केल्या.

बांगलादेशचा संघ 150 धावांवर बाद झाल्यानंतर भारतानं फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मयंक आणि चेतेश्वर यांनी चांगली सुरुवात केली. मात्र पुजारा 54 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली भोपाळा न फोडता माघारी परतला. विराट कोहली बांगलादेशचा गोलंदाज अबु जाएदच्या दुसऱ्याच चेंडूवर पायचित झाला. त्यानंतर मयंक आणि अजिंक्य यांनी 168 धावांची भागिदारी केली. त्यानंतर 150 धावा सेलिब्रेशन केल्यानंतर विराटनं द्विशतक करण्यास सांगितले.

विराटनं दिलेल्या सल्ल्यावर थम्स अप केल्यानंतर मयंकने 200 धावा केल्या. त्यावर विराटला आत्मविश्वास खरा ठरवल्यानंतर मयंकनं हसत विराटला द्विशतक केले असे सांगितले. त्यानंतर विराटनं तीन बोट दाखवत त्रिशतक कर, असे सांगितले.

मयंकनं दुहेरी शतक पूर्ण करत ड्रॉन ब्रॅडमनला मागे टाकले. मयंकने 12 डावांमध्ये 2 द्विशतक करण्याची कामगिरी केली आहे. याआधी ब्रॅडमन यांनी 13 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. मयंकन आतापर्यंत फक्त 5 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यानं तीन शतक तर दोन द्विशतक लगावले. मयंकनं 303 चेंडूत द्विशतकी कामगिरी केली.

दरम्यान, बांगलादेश विरोधात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतानं 343 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवशी 86 धावांवर खेळायला सुरुवात केलेल्या भारतीय संघानं दुसऱ्या दिवसाअखेरीस 343 धावांची आघाडी मिळवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 06:52 PM IST

ताज्या बातम्या