India vs Bangladesh : इंदूरमध्ये मयंक अग्रवालचं वादळ! षटकार खेचून पूर्ण केलं द्विशतक

India vs Bangladesh : इंदूरमध्ये मयंक अग्रवालचं वादळ! षटकार खेचून पूर्ण केलं द्विशतक

षटकारासह मयंक अग्रवालनं पूर्ण केले द्विशतक.

  • Share this:

इंदूर, 15 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवालनं आणखी एक जबरदस्त कामगिरी केली. बांगलादेश विरोधात मयंकनं आपल्या करिअरमधलं दुसरं द्विशतक पूर्ण केलं. याआधी 183 चेंडूत शतकी खेळी केली होती. मयंकनं दक्षिण आफ्रिका विरोधात पहिलं द्विशतक पूर्ण केलं होतं. 196 धावांवर असताना षटकार खेचत अग्रवालनं ही कामगिरी केली. याचबरोबर मयंकनं डॉन ब्रॅडमनला मागे टाकण्याची कामगिरी केली आहे. मयंकने 12 डावांमध्ये 2 द्विशतक करण्याची कामगिरी केली आहे. याआधी ब्रॅडमन यांनी 13 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

मयंकन आतापर्यंत फक्त 5 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यानं तीन शतक तर दोन द्विशतक लगावले. मयंकनं 303 चेंडूत द्विशतकी कामगिरी केली. त्यानंतर विराटनं मयंकला आता त्रिशतकी कामगिरी कर असा सल्ला दिला.

बांगलादेशचा संघ 150 धावांवर बाद झाल्यानंतर भारतानं फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मयंक आणि चेतेश्वर यांनी चांगली सुरुवात केली. मात्र पुजारा 54 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली भोपाळा न फोडता माघारी परतला. विराट कोहली बांगलादेशचा गोलंदाज अबु जाएदच्या दुसऱ्याच चेंडूवर पायचित झाला.बांगलादेशचा गोलंदाज अबु जाएदनं पायचितचं अपिल केलं पण मैदानावरील पंचांनी ते फेटाळून लावलं. त्यानंतर यष्टीरक्षक लिंटन दास आणि गोलंदाजांनी कर्णधाराला डीआरएस घेण्याबाबत सांगितलं. तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू पाहिल्यानंतर चेंडू स्टम्पवर आदळत असल्याचं दिसताच कोहलीला बाद दिलं. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अग्रवाल यांनी शानदार भागिदारी केली. या दोघांनी 190 धावा जोडल्या. मात्र अजिंक्य रहाणेला आपले शतक पूर्ण करता आले नाही, रहाणे 86 धावा करत बाद झाला.

बांगलादेशकडून अबू जाएदनं 4 विकेट घेतल्या. त्याशिवाय एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या दिवशी भारताकडून शमीने 3, इशांत शर्मा, उमेश यादव आणि आर.अश्विन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेत बांगलादेशच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले.

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 9 कसोटी सामने झाले आहेत त्यापैकी 7 सामन्यात भारताने विजय मिळवाल असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या या मालिकेत विजय मिळवून सलग 12वी कसोटी मालिका जिंकण्याचा कोहली आणि संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यात विराट कोहलीला कर्णधार म्हणून 5 हजार धावा करण्यासाठी 32 धावांची गरज आहे. तर कर्णधार म्हणून सर्वधिक शतक स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्याला आणखी एका शतकाची गरज आहे. सध्या हा विक्रम कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या दोघांच्या नावावर आहे. या दोघांनी कर्णधारपदावर असताना प्रत्येकी 19 शतके केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 03:58 PM IST

ताज्या बातम्या