India vs Bangladesh Day 2 : मयंक अग्रवालची शानदार खेळी, भारताकडे 343 धावांची मॅच विनिंग आघाडी

India vs Bangladesh Day 2 : मयंक अग्रवालची शानदार खेळी, भारताकडे 343 धावांची मॅच विनिंग आघाडी

बांगलादेश विरोधात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतानं मजबूत आघाडी घेतली आहे.

  • Share this:

इंदूर, 15 नोव्हेंबर : बांगलादेश विरोधात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतानं 343 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवशी 86 धावांवर खेळायला सुरुवात केलेल्या भारतीय संघानं दुसऱ्या दिवसाअखेरीस 343 धावांची आघाडी मिळवली आहे. यात मयंक अग्रवालची शानदार खेळी चर्चेचा विषय ठरली. मयंक अग्रवालनं एकहाती भारताला मजबूत स्थितीत पोहचवले. मयंक अग्रवालची द्विशतकी खेळी आणि जडेजाचे अर्धशतक यांच्यामुळं भारतानं 493 धावापर्यंत मजल मारली.

बांगलादेशचा संघ 150 धावांवर बाद झाल्यानंतर भारतानं फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मयंक आणि चेतेश्वर यांनी चांगली सुरुवात केली. मात्र पुजारा 54 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली भोपाळा न फोडता माघारी परतला. विराट कोहली बांगलादेशचा गोलंदाज अबु जाएदच्या दुसऱ्याच चेंडूवर पायचित झाला.बांगलादेशचा गोलंदाज अबु जाएदनं पायचितचं अपिल केलं पण मैदानावरील पंचांनी ते फेटाळून लावलं. त्यानंतर यष्टीरक्षक लिंटन दास आणि गोलंदाजांनी कर्णधाराला डीआरएस घेण्याबाबत सांगितलं. तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू पाहिल्यानंतर चेंडू स्टम्पवर आदळत असल्याचं दिसताच कोहलीला बाद दिलं. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अग्रवाल यांनी शानदार भागिदारी केली. या दोघांनी 190 धावा जोडल्या. मात्र अजिंक्य रहाणेला आपले शतक पूर्ण करता आले नाही, रहाणे 86 धावा करत बाद झाला.

वाचा-इंदूरमध्ये मयंक अग्रवालचं वादळ! षटकार खेचून पूर्ण केलं द्विशतक

वाचा-128 दिवसांनी धोनीनं हातात घेतली बॅट, चाहत्यांनो VIDEO मिस करू नका

त्यानंतर मयंक अग्रवालनं 243 धावांपर्यंत मजल मारली. मयंकनं कसोटीमध्ये बांगलादेश विरोधात सर्वोत्कृष्ठ धावा केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजानं आक्रमक फलंदाजी करत भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. रवींद्र जडेजा (60) आणि उमेश यादव (25) सध्या फलंदाज करत आहे.

बांगलादेशकडून अबू जाएदनं 4 विकेट घेतल्या. त्याशिवाय एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या दिवशी भारताकडून शमीने 3, इशांत शर्मा, उमेश यादव आणि आर.अश्विन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेत बांगलादेशच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले.

वाचा-‘संकटमोचक’ मुंबईकरालाच रोहितनं दिला डच्चू, 4 वर्षात फक्त एकदा दिली संधी

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 9 कसोटी सामने झाले आहेत त्यापैकी 7 सामन्यात भारताने विजय मिळवाल असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या या मालिकेत विजय मिळवून सलग 12वी कसोटी मालिका जिंकण्याचा कोहली आणि संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यात विराट कोहलीला कर्णधार म्हणून 5 हजार धावा करण्यासाठी 32 धावांची गरज आहे. तर कर्णधार म्हणून सर्वधिक शतक स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्याला आणखी एका शतकाची गरज आहे. सध्या हा विक्रम कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या दोघांच्या नावावर आहे. या दोघांनी कर्णधारपदावर असताना प्रत्येकी 19 शतके केली आहेत.

Tags:
First Published: Nov 15, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading