India vs Bangladesh : रोहित शर्मानं मोडला धोनी आणि विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण ट्विटरवर झाला ट्रोल

एकाच सामन्यात रोहितनं टाकले विराट आणि धोनीला मागे.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 07:52 PM IST

India vs Bangladesh : रोहित शर्मानं मोडला धोनी आणि विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण ट्विटरवर झाला ट्रोल

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला टी-20 सामना अरुण जेटली मैदानावर होत आहे. या सामन्यात बांगलादेशनं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच सामन्यात मैदानात उतरताच कर्णधार रोहित शर्मानं महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड मोडला. पुढच्या काही चेंडूत रोहितनं लगेचच विराट कोहलीलाही मागे टाकले.

रोहित शर्मानं शिखर धवनसोबत सलामीला फलंदाजी करताच चौकारानं सुरुवात केली. दरम्यान त्याआधी रोहित सर्वात जास्त टी-20 सामने खेळणारा भारतीय खेळाडू झाला. रोहितनं महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले, रोहितचा हा 99वा टी-20 सामना आहे. त्यानंतर 7 धावा करताच रोहितनं विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.

उजव्या हाताचा फलंदाज रोहित शर्मा सगळ्यात जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. विराटनं आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये 2450 धावा केल्या आहेत. तर, रोहितनं टी-20 क्रिकेटमध्ये 2452 धावा केल्या आहेत. मात्र या विक्रमाला गवसणी घालताच रोहित शर्मा 9 धावांवर बाद झाला. त्यामुळं रोहित शर्माला ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा-हा तर मुंबई vs बांगलादेश सामना, ‘या’ मुंबईकरांवर टीम इंडियाची मदार

वाचा-'5 कोटींसाठी लगावले 5 सिक्स', टीम इंडियाच्या नव्या युवीचा धक्कादायक खुलासा

चार शतक लगावणारा रोहित एकमेव फलंदाज

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार शतक लगावणारा रोहित शर्मा जगातला पहिला खेळाडू आहे. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूनं अशी कामगिरी केली नाही आहे. एवढेच नाही तर सर्वात जास्त अर्धशतकी खेळी करणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू आहे. अर्धशतकांच्या बाबतीत विराट रोहितच्या एक पाऊल पुढे आहे. विराटनं 22 तर रोहितनं 21वेळा अर्धशतकी कामगिरी करण्याची कामगिरी केली आहे.

वाचा-टीक टॉक स्टारनं लीक केला क्रिकेटपटूचा न्यूड व्हिडीओ, सोशल मीडियावर खळबळ

VIDEO : अधिकाऱ्यांना खुर्चीसह पेटवू, सेना आमदाराची धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...