India vs Bangladesh T20 : भारतीय संघाला मोठा झटका, सरावादरम्यान रोहित शर्मा जखमी

India vs Bangladesh T20 : भारतीय संघाला मोठा झटका, सरावादरम्यान रोहित शर्मा जखमी

भारत-बांगलादेश यांच्यात 3 नोव्हेंबरला पहिला टी-20 सामना होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ नवी दिल्लीमध्ये सराव करत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात 3 नोव्हेंबरला पहिला टी-20 सामना होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ नवी दिल्लीमध्ये सराव करत आहे. एकीकडे दिल्लीतील वायू प्रदुषणामुळं खेळाडूंना मास्क घालून सराव करावा लागत आहे. तर, दुसरीकडे पर्यावरणमित्रांनी हा सामना होऊच नये या आशयाचे पत्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना लिहिले होते. मात्र, गांगुलीनं सामना नवी दिल्लीतच होणार असे स्पष्ट केले. त्यामुळं सोमवारी आणि मंगळवारी बांगलादेशच्या खेळाडूंनी मास्क परिधान करून सामना खेळला.

दरम्यान, सामन्यासाठी दोन दिवस उरले असताना भारतीय संघासाठी एक मोठी बातमी आली आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर शुक्रवारी सराव करत असताना टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. दुखापतीमुळं रोहितला सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले.

नेट प्रॅक्टिस दरम्यान गोलंदाजाचा चेंडू रोहितच्या पायाला लागला, त्यामुळं अभ्यास सोडून रोहित बाहेर गेला. लगेचच फिजिओनं रोहितला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. दरम्यान रोहितची जखम गंभीर आहे की नाही, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

वाचा-BCCIच्या इनिंगमध्ये गांगुलीला हवी मास्टर ब्लास्टरची साथ, सचिनला देणार मोठी ऑफर

भारत-बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामने होणार आहेत. या मालिकेसाठी विराट कोहलीचा विश्रांती देत रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आले. दरम्यान याआधी दोन दिवस दोन्ही संघांनी कोटला येथे अभ्यास केला. दरम्यान प्रदुषणामुळं दोन्ही संघांना काही काळ मैदानाबाहेर सराव करता आला नाही.

वाचा-आत्मविश्वासनं फलंदाजाचा केला घात, पाहा क्रिकेटमधल्या अजब रनआऊटचा VIDEO

दिवाळीमुळे वाढले वायू प्रदुषण

दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले गेल्यामुळं दिल्लीतील वायू गुणवत्ता खालावली आहे. वायू गुणवत्ता आकड्यांनुसार (Air Quality Index) दिल्लीतील हवा सध्या अशुध्द असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ (Delhi District Cricket Association) यांनी सामना ठरलेल्या वेळेनुसार आणि दिल्लीमध्येच होणार असल्याचे सांगितले.

‘सामन्यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत’

भारत-बांगलादेश सामन्याबाबत सौरव गांगुलीला विचारले असता त्यांनी, सामना दिल्लीतच होणार असे सांगितले. तर, डीडीसीएचे अधिकारी यांनी, “रविवारी तीन नोव्हेंबर रोजी होणारा सामना ठरल्याप्रमाणे होईल. यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. बीसीसीआयच्या वतीनं सामन्याचे ठिकाण बदलण्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही”, असे सांगितले.

वाचा-पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर ‘मौका-मौका’, आज होणार भारत-पाक सामना

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 04:22 PM IST

ताज्या बातम्या