India vs Bangladesh : भारतानं पदोपदी बांगलादेशला रडवलं! दर्जेदार रेकॉर्ड सांगतात 10 वर्षांची कहाणी

India vs Bangladesh : भारतानं पदोपदी बांगलादेशला रडवलं! दर्जेदार रेकॉर्ड सांगतात 10 वर्षांची कहाणी

भारत पुन्हा करणार 'बंगाल टायगर'ची शिकार. टीम इंडियाचे हे दर्जेदार रेकॉर्ड तुम्हाला माहित आहेत का?

  • Share this:

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिका संघाला टी-20 आणि कसोटी मालिकेत क्लिन स्विप दिल्यानंतर आता भारतीय संघ बांगलादेशची शिकार करण्यास सज्ज आहे. 3 नोव्हेंबरपासून बांगलादेश आणि भारत यांच्यात टी-20 मालिका सुरू होत आहे. नवी दिल्लीपासून या मालिकेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 7 नोव्हेंबर (राजकोट) आणि तिसरा सामना 10 नोव्हेंबरला नागपुर येथे होणार आहे.

भारत-बांगलादेश यांच्यातील रेकॉर्डवर एक नजर टाकल्यास भारतानं नेहमीच बांगलादेशवर राज्य केले आहे. बांगलादेशचे रेकॉर्ड खराब आहेत. आतापर्यंत एकही सामना बांगलादेशनं जिंकला नाही आहे. भारतीय संघानं आतापर्यंत बांगलादेश विरोधात 8 सामने खेळले आहेत. यात भारताचा रेकॉर्ड हा 100 टक्के आहे. दोन्ही संघांमध्ये 2009पासून सामने खेळले जात आहे. शेवटचा टी-20 सामना 2018मध्ये झाला होता.

वाचा-‘3 तासांच्या टी-20 सामन्यानं मरणार नाहीत’, प्रदूषणावरून प्रशिक्षकानं सुनावलं

2018मध्ये झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या तोंडचा घास पळवला होता. दिनेश कार्तिकनं शेवटच्या चेंडूवर सौम्य सरकारला षटकार मारत सामना खिशात घातला. या मालिकेत विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्वा देण्यात आले आहे.

रोहित शर्माचे रेकॉर्ड भारी

दोन्ही संघांमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वात जास्त 356 धावा आहेत. रोहितनं 44.50च्या सरासरीनं या धावा केल्या आहेत. रोहितची सर्वश्रेष्ठ खेळी 89 आहे. यानंतर बांगलादेशचा सब्बीर रहमान याचा क्रमांक लागतो. याचबरोबर रोहितच्या नावावर सर्वात जास्त अर्धशतकंही आहे. त्यानं 8 सामन्यात 8 डावांमध्ये 4 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. त्यानंतर शिखर धवनचा क्रमांक लागतो.

वाचा-चेंडू कुडतडल्याप्रकरणी पाकच्या ‘विराट’वर संकटांचे ढग, होणार कारवाई

असा आहे भारताचा टी-20 संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकुर.

असा आहे भारताचा कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋध्दीमान साहा, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गील, ऋषभ पंत.

वाचा-BCCIच्या इनिंगमध्ये गांगुलीला हवी मास्टर ब्लास्टरची साथ, सचिनला देणार मोठी ऑफर

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2019 07:41 AM IST

ताज्या बातम्या