India vs Bangladesh : प्रदूषणाच्या वादात अडकलेल्या दिल्ली टी-20त घडणार इतिहास, दोन्ही संघांना विक्रमाची संधी

India vs Bangladesh : प्रदूषणाच्या वादात अडकलेल्या दिल्ली टी-20त घडणार इतिहास, दोन्ही संघांना विक्रमाची संधी

भारत आणि बांगलादेश यांच्यात दिल्ली येथे आज पहिला टी-20 सामना होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर पहिला टी-20 सामना होणार आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होणार असला तरी, या सामन्यावर पावसाचे आणि प्रदूषणाचे सावट आहे. असे असले तरी, हा टी-20 सामना ऐतिहासिक होणार आहे. या सामन्यात भारत-बांगलादेशचा संघ मैदानावर उतरताच एक इतिहास रचणार आहेत.

आजपासून भारत-बांगलादेशमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेस सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये होणारा हा सामना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासतील 1000वा सामना असणार आहे. भारतीय संघाकडे या सामन्याचे यजमानपद असल्यामुळं हा सामाना जिंकण्यासाठी रोहित शर्मा आणि कंपनी सज्ज असणार आहे.

1000वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना

क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉर्म्याटला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. आयसीसीच्या वतीनं 2005मध्ये पहिल्यांदा टी-20 सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. पहिला टी-20 सामना 7 फेब्रुवारी 2005मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आला होता. हा सामना 1000वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

वाचा-विराटनं नाकारलं पण रोहितनं घेतलं, खेळाडू करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण

असे आहे भारत-बांगलादेश टी-20 रेकॉर्ड

भारत-बांगलादेश यांच्यातील रेकॉर्डवर एक नजर टाकल्यास भारतानं नेहमीच बांगलादेशवर राज्य केले आहे. बांगलादेशचे रेकॉर्ड खराब आहेत. आतापर्यंत एकही सामना बांगलादेशनं जिंकला नाही आहे. भारतीय संघानं आतापर्यंत बांगलादेश विरोधात 8 सामने खेळले आहेत. यात भारताचा रेकॉर्ड हा 100 टक्के आहे. दोन्ही संघांमध्ये 2009पासून सामने खेळले जात आहे. शेवटचा टी-20 सामना 2018मध्ये झाला होता. 2018मध्ये झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या तोंडचा घास पळवला होता. दिनेश कार्तिकनं शेवटच्या चेंडूवर सौम्य सरकारला षटकार मारत सामना खिशात घातला. या मालिकेत विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्वा देण्यात आले आहे.

वाचा-INDvsBAN : दिल्लीत पावसामुळे खेळाडूंना धोका, BCCI चं टेन्शन वाढलं

रोहित शर्माचे रेकॉर्ड भारी

दोन्ही संघांमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वात जास्त 356 धावा आहेत. रोहितनं 44.50च्या सरासरीनं या धावा केल्या आहेत. रोहितची सर्वश्रेष्ठ खेळी 89 आहे. यानंतर बांगलादेशचा सब्बीर रहमान याचा क्रमांक लागतो. याचबरोबर रोहितच्या नावावर सर्वात जास्त अर्धशतकंही आहे. त्यानं 8 सामन्यात 8 डावांमध्ये 4 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. त्यानंतर शिखर धवनचा क्रमांक लागतो.

दिल्ली प्रदूषणाच्य विळख्यात

हवा प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या दिल्लीत रविवारी सकाळी पाऊस झाला. यामुळे प्रदुषणात वाढ झाली. पावसामुळे प्रदुषण कमी होतं पण त्यासाठी जोरदार पाऊस व्हायला हवा. दिल्लीत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानं प्रदुषणाची पातळी 625 वर पोहचली आहे. सरकारी संस्था सफरने सांगितल्यानुसार AQI सकाळी साडेसहा वाजता 410 होता. पाऊस पडून गेल्यानंतर 9 वाजता तो 625 वर पोहचला. ही गोष्ट गंभीर असून आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी प्रदुषणाची पातळी 500 च्या आसपास होती पण हलक्या पावसाने यात वाढ झाली.बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात खेळाडूंना दिल्लीतील वाढलेल्या प्रदुषणाचा त्रास होऊ शकतो. खेळाडूंना श्वास घेण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच डोळ्यात जळजळ होण्याची शक्यता आहे. 2017 ध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या लंकेच्या काही खेळाडूंना उलट्या झाल्या होत्या. बांगलादेशविरुद्ध असं काही झालं तर बीसीसीआयसाठी ही बाब लज्जास्पद असेल.

वाचा-भारतानं पदोपदी बांगलादेशला रडवलं! दर्जेदार रेकॉर्ड सांगतात 10 वर्षांची कहाणी

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, यजुर्वेद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, ऋषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर.

बांगलादेश : महमदुल्ला रियाद (कर्णधार), तैजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुशफिकर रहिम, अफिफ हुसैन, मोसादीक हुसेन सैकत, अमिनूल इस्लाम बिपलॉब, अराफत सन्नी, अबू हैदर, अल-अमिन हुसैन, मुस्ताफिझूर रेहमान, शफिऊल इस्लाम.

Published by: Priyanka Gawde
First published: November 3, 2019, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading