VIDEO : '5 कोटींसाठी लगावले 5 सिक्स', टीम इंडियाच्या नव्या युवीचा धक्कादायक खुलासा

युवराज सिंगप्रमाणे आक्रमक फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूनं केला धक्कादायक खुलासा.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 07:10 PM IST

VIDEO : '5 कोटींसाठी लगावले 5 सिक्स', टीम इंडियाच्या नव्या युवीचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : भारतीय संघ आज बांगलादेश विरोधात पहिला टी-20 सामना होणार आहे. भारताचा फिरकी गोलंदाजी युजवेंद्र चहल या सामन्यातून पुन्हा एकदा संघात पुनरागमन करणार आहे. याचबरोबर चहलनं आपल्या नव्या शोमध्येही कमबॅक केला आहे. चहल टीव्हीचा आणखी एक भाग बीसीसीआयनं आपल्या अधिकृत अकाउंटवर टाकला आहे.

भारत-बांगलादेश यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळं चहलसोबतच शिवम दुबे, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर यांसारख्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. मुंबईकर शिवम दुबे याची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. दरम्यान चलनं आपल्या चहल टीव्ही या कार्यक्रमात शिवम दुबे आणि श्रेयस अय्यरनं यांना मजेशीर प्रश्न विचारले.

वाचा-टीक टॉक स्टारनं लीक केला क्रिकेटपटूचा न्यूड व्हिडीओ, सोशल मीडियावर खळबळ

चहलनं या दोन्ही मुंबईकर खेळाडूंची ओळख मुस्तंडे म्हणजेच बलवान अशी केली. यावेळी शिवम दुबेनं आयपीएलमध्ये पाच चेंडूत सलग पाच षटकार का मारले, याबाबत खुलासा केला. चहलच्या प्रश्नावर शिवमनं, आयपीएलमध्ये लागलेल्या कोट्यावधींच्या बोलींमुळे ही कामगिरी केल्याचे स्पष्ट केले.

वाचा-दिल्लीतील टी-20वर टांगती तलवार कायम, सामना होणार की नाही 'ही' आहे डेडलाईन

आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाकडून 2019मध्ये शिवम खेळला होता. बंगळुरू संघानं शिवमला 5 कोटींना विकत घेतले होते. एका समन्यात पाच चेंडूवर पाच सिक्स शिवाय इतर सामन्यात शिवमला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही.

वाचा-प्रदूषणाच्या वादात अडकलेल्या दिल्ली टी-20त घडणार इतिहास!

मात्र, अष्टपैलू खेळाडूनं शिवमने विजय हजारे स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले. 26 वर्षीय शिवमनं 48.19च्या सरासरीनं धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याला बांगलादेश विरोधात टी-20 संघात स्थान मिळाले. विजय हजारे स्पर्धेत शिवमनं 67 चेंडूत शानदार अशा 118 धावांची खेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2019 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...