India vs Bangladesh : ‘3 तासांच्या टी-20 सामन्यानं तुम्ही मरणार नाही’, दिल्ली प्रदूषणावरून प्रशिक्षकानं सुनावलं

सध्या दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स AQI म्हणजे हवेतल्या घातक कणांची संख्या 500च्या वर पोहोचली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 05:39 PM IST

India vs Bangladesh : ‘3 तासांच्या टी-20 सामन्यानं तुम्ही मरणार नाही’, दिल्ली प्रदूषणावरून प्रशिक्षकानं सुनावलं

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला य नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना 3 नोव्हेंबरला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान दिल्लीतील सामन्यावरून सध्या वादंग सुरू आहेत. कारण दिल्लीत हवेतले पोल्युटंट प्रचंड वाढले आहेत.

सध्या दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स AQI म्हणजे हवेतल्या घातक कणांची संख्या 500च्या वर पोहोचली आहे. त्यामुळे हे प्रमाण 0 ते 50 दरम्यान असेल तरच हवा चांगली असल्याचं मानलं जातं. दिल्लीची हवा हिवाळ्यात वाईट होते आणि AQI 400 च्या आसपास पोहोचतो. या वेळी तो 500च्यावर पोहोचल्यामुळे Emergency जाहीर केली आहे. त्यामुळं येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. म्हणूनच दिल्लीमध्ये सामना होऊ नये, अशी मागणी पर्यावरणमित्रांनी आणि खासदार गौतम गंभीर यांनी केली आहे.

वाचा-भारतीय संघाला मोठा झटका, सरावादरम्यान रोहित शर्मा जखमी

दिल्लीतील हवा दुषित असली तरी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ (Delhi District Cricket Association) यांनी सामना ठरलेल्या वेळेनुसार आणि दिल्लीमध्येच होणार असल्याचे सांगितले. या सगळ्यात आता बांगलादेशच्या प्रशिक्षकांनी प्रदूषणावर गोंधळ घालणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.

बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डोमिंगोयांनी दिल्लीमध्ये होणाऱ्या टी-20 सामन्यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. सध्या बांगलादेशचा संघ कोटलामध्ये मास्क परिधान करून सराव करत आहेत. याबाबत डोमिंगो यांनी, “प्रदूषणामुळं कोणी मरणार नाही आहे. प्रदूषण आमच्या देशातही आहे. त्यामुळं दिल्लीतील दुषित हवा आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही. कारण जगातल्या सर्व देशांमध्ये ही समस्या आहे”, असे सांगितले.

Loading...

वाचा-चेंडू कुडतडल्याप्रकरणी पाकच्या ‘विराट’वर संकटांचे ढग, होणार कारवाई

‘खेळाडू मास्क परिधान करून सतत खेळत नाही’

रसेल यांनी प्रदूषणाबाबत सांगताना, “आम्हाला माहित आहे श्रीलंकेच्या संघाला 2017मध्ये संघर्ष करावा लागला. मात्र आमच्यासाठी ही समस्या गंभीर नाही. तीन तासांची गोष्ट आहे फक्त, यात कोणाचा जीव जाणार नाही. खेळाडूंना त्रास होईल पण जीव जाणार नाही”, असे सांगितले.

2017मध्ये बीसीसीआयवर ओढवली होती नामुष्की

3 नोव्हेंबर रोजी भारत-बांगलादेश यांच्यातील सामना सायंकाळी 7 वाजता होणार आहे. दरम्यान अरुण जेटली स्टेडियमपासून एक किमी दूर हवेची गुणवत्ता सर्वात खराब आहे. त्यामुळं खेळाडूंना सरावादरम्यान मास्कचा वापर करावा लागला. याआधी 2017मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेलाही मास्क लावून सामना खेळावा लागला होता.

वाचा-पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर ‘मौका-मौका’, आज होणार भारत-पाक सामना

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 05:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...