India vs Bangladesh : पंतनं दिला धोका आणि मैदानात सुरु झाला धोनी...धोनीचा जयघोष!

ऋषभ पंतनं भर मैदानात रोहित शर्माला धोका दिल्यानंतर चाहत्यांना धोनीची झाली आठवण.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 01:46 PM IST

India vs Bangladesh : पंतनं दिला धोका आणि मैदानात सुरु झाला धोनी...धोनीचा जयघोष!

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकत विजयी आघाडी मिळवली. नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यांत बांगलादेशनं भारतावर 7 विकेटनं विजय मिळवला. हा विजयासह बांगलादेशनं टी-20 क्रिकेटमध्ये एका इतिहासाची नोंद केली आहे. या सामन्याचा मात्र ऋषभ पंतपासून कर्णधार रोहित शर्मा यांच्या चुका संघाला महागात पडल्या.

बांगलादेशकडून भारतानं दिलेल्या 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुश्फिकुर रहीमनं तुफान फटकेबाजी केली. मुश्फिकुरनं 43 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार खेचत नाबाद 60 धावा केल्या. मात्र भारतीय फलंदाजांना विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं संघात युवा खेळाडूंना जागा देण्यात आली. मात्र एकाही युवा खेळाडूची बॅट तळपली नाही.

वाचा-हाच तो क्षण, हीच ती चुक! अन् भारतानं गमावला सामना; पाहा VIDEO

मात्र गोलंदाजीमध्ये भारतीय संघ जास्त कमकुवत दिसला. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या 18व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मुश्फिकुर रहीम बाद होता, मात्र भारतानं रिव्ह्यु घेतला नाही. विकेटकीपर ऋषभ पंचनेही रोहित शर्माला कोणता सल्ला दिला नाही. दरम्यान याच ओव्हरच्ये शेवटच्या चेंडूवर सौम्य सरकार विरोधात पंतनं अपील केले. पंचांनी नाबाद घोषित केल्यानंतरही पंतच्या म्हणण्यानुसार रोहितनं डीआरएस घेतला. मात्र यात फलंदाजा नाबाद राहिला आणि भारताला डीआरएस गमवावा लागला. त्यानंतर मैदानात एकच धोनी...धोनी अशा जयघोषाला सुरुवात झाली.

वाचा-पंतचा DRS हट्ट, रोहितनं कपाळावर मारला हात; पाहा VIDEO

Loading...

रोहितनं घेतली पंतची बाजू

सामन्यानंतर पंतन या चुका मान्य करत, “रिव्ह्युसाठी कर्णधार हा गोलंदाज आणि विकेटकीपरवर अवलंबुन असतो. पंत युवा आहे, काळानुसार तो चांगले निर्णय नक्की घेऊ शकतो. पंतनं आतापर्यंत फक्त 10 ते 12 टी-20 सामने खेळले आहेत. त्यामुळं त्याला तेवढा वेळ देण्याची गरज आहे”, असे सांगितले.

वाचा-'आम्ही चुका केल्या', रोहित शर्माने सांगितलं बांगलादेशविरुद्ध पराभवाचं कारण

रोहितनं मान्य केल्या चुका

सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितलं की, “फलंदाजांनी धावा केल्या होत्या. धावसंख्येचा बचाव करणं शक्य होतं. मात्र, मैदानावर आम्ही अनेक चुका केल्या आणि सामना गमावला. खेळाडुंचा अनुभव काही ठिकाणी कमी पडला. चुकांमधून ते शिकतील आणि पुढच्या वेळी चुका करणार नाहीत. डीआरएसमध्ये आमच्याकडून चूका झाल्या”. तसेच, रोहित शर्माने बांगलादेशच्या संघाचं विजयाबद्दल अभिनंदन करत बांगलादेश विजयाचे अधिकारी होते. जेव्हा आम्ही फलंदाजी करत होतो तेव्हापासूनच आमच्यावर दबाव टाकला होता. तसचं भारताकडून क्षेत्ररक्षणही खराब झाल्याचं रोहित म्हणाला.

वाचा-‘दिल्लीत दोन आणीबाणी, एक वायू प्रदूषण आणि...’; नेटकऱ्यांची ट्विटरवर फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 01:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...