India vs Bangladesh : भारताची ऐतिहासिक विजयाकडे आगेकुच, दुसऱ्या दिवसाअखेर 89 धावांची आघाडी

India vs Bangladesh : भारताची ऐतिहासिक विजयाकडे आगेकुच, दुसऱ्या दिवसाअखेर 89 धावांची आघाडी

ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशवर विजयी आघाडी मिळवली आहे.

  • Share this:

कोलकाता, 23 नोव्हेंबर : ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं विजयाच्या दिशेने आगेकुच करण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी गोलंदाजांनी अधिराज्य गाजवल्यानंतर, दुसऱ्या दिवशी विराट कोहलीनं विक्रमी कामगिरी केली. भारतानं दुसऱ्या दिवशी 347 धावांवर डाव घोषित केला. दरम्यान दुसऱ्या दिवशी बांगलादेशला 6 विकेट गमावत 152 धावा करता आल्या. त्यामुळं भारताकडे 89 धावांची आघाडी आहे.

दुसऱ्या दिवशीही या सामन्यावर भारतीय संघाने अधिराज्य गाजवले. सुरुवातीला विराट कोहलीनं फलंदाजीनं कमाल केल्यानंतर गोलंदाजांनीही आपले काम चोख पार केले. दुसऱ्या दिवशी इशांत शर्मानं 4 तर उमेश यादवनं 2 विकेट घेतल्या. पहिल्या दिवशी लिंटन दास रिटार्यड हर्ट झाल्यानंतर आज मोहम्मदुल्लाह जखमी होऊन माघारी परतला. सध्या मुशफिकूर रहिम 59 धावांवर फलंदाजी करत आहे. त्यामुळं या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ आपले वर्चस्व गाजवू शकतो.

पहिल्या दिवशी 175 धावांवरून भारतानं खेळण्यास सुरुवात केल्यानंतर विराट कोहलीनं बांगलादेशच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्यात शतक झळकावलं आहे. विराटच्या या शतकाच्या जोरावर कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे आपलं अर्धशतक झळकावल्यानंतर माघारी परतले, मात्र विराट खेळपट्टीवर तग ठरून राहिला. दरम्यान, डे-नाईट कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने कोलकाता कसोटी सामन्यावर आपली पकड आता आणखी मजबूत बसवली आहे. पहिल्या दिवसाअखेरीस 3 गडी गमावल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीनं भारतीय डावाला सुरुवात केली. दरम्यान, अजिंक्य रहाणे अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच माघारी परतला. त्यानंतर रविंद्र जडेजाच्या मदतीनं विराट कोहलीनं आपले 27वे शतक झळकावलं. अखेर विराट 194 चेंडूत 136 धावा करत बाद झाला.

विराटनं केली विक्रमी कामगिरी

बांगलादेश विरोधात शतकी कामगिरी करत विराटनं इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार जो रुटच्या डे-नाईट कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रुटने 2017मध्ये डे-नाईट कसोटीत 136 धावांची खेळी केली होती. विराटने आज या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तर, विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या 130 धावांच्या विक्रमाला मागे टाकला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराटचे हे 41वे शतक आहे. या कामगिरीसह विराट कोहलीने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगशी बरोबरी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2019 05:11 PM IST

ताज्या बातम्या