India vs Bangladesh : पंतच्या ‘त्या’ स्टम्पिंगवर रोहितनं भरमैदानात तिसऱ्या पंचांना घातली शिवी, VIDEO VIRAL

India vs Bangladesh : पंतच्या ‘त्या’ स्टम्पिंगवर रोहितनं भरमैदानात तिसऱ्या पंचांना घातली शिवी, VIDEO VIRAL

रोहितची सटकली. भरमैदानात तिसऱ्या पंचांना घातली शिवी.

  • Share this:

राजकोट, 07 ऑक्टोबर : भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात अनेक नाट्यमय प्रकार घडले. भारतीय गोलंदाजांच्या खराब सुरुवातीनंतर कमबॅक करायला गेलेल्या संघाच्या आशांवर पंतनं पाणी फेरले. चहलच्या 6व्या ओव्हरमध्ये एक अजब प्रकार घडला. चहलच्या तिसऱ्या चेंडूवर लिंटन दास फलंदाजी करत होता. दास मोठा शॉट खेळण्याचा नादात क्रिझ सोडून पुढे गेला तेवढ्यात पंतनं त्याला स्टम्प आऊट केले. पंतनं जोरात केलेल्या अपीलमुळं पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावला आणि दासला नाबाद घोषित करण्यात आले. अखेर चहलच्या पुढच्याच ओव्हरला पंतनं बदला घेत सौम्य सरकारला माघारी धाडले.

मात्र 13व्या ओव्हरमध्येही असाच प्रकार घडला. चहल्याच गोलंदाजीवर सौम्य सरकारला पंतनं स्टम्प आऊट केले. मात्र दासबाबत झाल्या प्रकारामुळं सौम्य सरकारनं तिसऱ्या पंचांकडे निर्णय मागितला. मात्र यावेळी पंतनं यावेळी कोणतीही चूक केली नाही. तरी स्क्रिनवर चुकून नॉट आऊटचा निर्णय आला. त्यामुळं सौम्य सरकार पुन्हा मैदानात आला. त्यानंतर मैदानावरच्या पंचांनी त्याला बाद असल्याचे सांगितले. या सगळ्या प्रकारामुळं रोहित शर्मानं मैदानात तिसऱ्या पंचांना शिवी घातली. हा व्हिडीओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

रोहित शर्माची शतकी कामगिरी

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा राजकोटमध्ये बांगलादेशविरोधात मैदानात उतरताच एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. आजचा टी-20 सामना हा रोहित शर्माचा 100वा सामना आहे. 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू आहे.पाकिस्तानचा ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 111 सामने खेळले आहेत. त्यानंतर रोहित शर्मा आणि शाहिद आफ्रिदी यांचा क्रमांक लागतो. या दोन्ही खेळाडूंनी 99 सामने खेळले आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात रोहितनं 99वा सामना खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 98 सामने खेळणाऱ्या धोनीला मागे टाकले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 08:37 PM IST

ताज्या बातम्या