India vs Bangladesh : फलंदाज होता आऊट पण पंतच्या एका चुकीमुळं NOT OUT, पाहा लाजिरवाणा VIDEO

तोंडघाशी पडला पंत, धोनी स्टाईल स्टम्प आऊट टीम इंडियाला पडणार महागात

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 08:01 PM IST

India vs Bangladesh : फलंदाज होता आऊट पण पंतच्या एका चुकीमुळं NOT OUT, पाहा लाजिरवाणा VIDEO

राजकोट, 07 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात दुसरा टी-20 सामना राजकोटमध्ये होत आहे. या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र रोहितचा हा निर्णय त्याला फळास येईल असे दिसत नाही आहे. रोहितनं संघात कोणतेच बदल केले नाही त्यामुळं या सामन्यातही भारताची मदार युवा खेळाडूंवर असणार आहे. मात्र या सामन्यात गोलंदाजांनी खराब सुरुवात केली.

खलील अहमदनं सामन्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा दिल्या. मात्र चहलच्या 6व्या ओव्हरमध्ये एक अजब प्रकार घडला. चहलच्या तिसऱ्या चेंडूवर लिंटन दास फलंदाजी करत होता. दास मोठा शॉट खेळण्याचा नादात क्रिझ सोडून पुढे गेला तेवढ्यात पंतनं त्याला स्टम्प आऊट केले. पंतनं जोरात केलेल्या अपीलमुळं पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावला आणि दासला नाबाद घोषित करण्यात आले.

दास नाबाद होण्यामागचे कारण म्हणजे ऋषभ पंत. आयसीसीच्या नियमानुसार स्टम्पआऊट करताना चेंडू हातात येण्याआधी ग्लोव्ह्ज स्टम्पच्या पुढे नसावेत. पंतबाबत असाच प्रकार घडला. पंतच्या या एका चुकीमुळं भारताला पहिली विकेट मिळाली नाही. पंतचे ग्लोव्ह्ज स्टम्पच्या पुढे असल्यामुळं तिसऱ्या पंचांनी नाबाद घोषित केले. त्यानंतर चहलनं हा टाकलेला चेंडूही नो-बॉल घोषित करण्यात आला. त्यामुळं चहलच्या या ओव्हरमध्ये 13 धावा गेल्या. त्यानंतर लगेचच पुढच्या ओव्हरमध्ये पंतनं बदला घेत दासला बाद केले.

दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यातही पंतच्या चुकांचा फटका संघाला बसला होता. पंतनं रोहितला डीआरएस घेण्यासाठी भाग पाडले होते, मात्र निर्णय पंचांच्या बाजूनं लागला होता. पंतच्या या चुकीमुळं पुन्हा एकदा त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

डावखुरा युवा फलंदाज आणि युवा विकेटकीपर ऋषभ पंत सातत्याने दोन्ही विभागांत अपयशी ठरत आहे. त्यामुळे या सामन्यात फलंदाजीत पंतने छाप न पाडल्यास संजू सॅमसनसाठी संघाचे दरवाजे खुले होऊ शकतात. त्याशिवाय रिव्ह्य़ू घेण्याच्या त्याच्या क्षमतेवरसुद्धा अनेक प्रश्नचिन्हे उभी ठाकली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 08:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...