India vs Bangladesh : रोहितचा 'वन मॅन शो'! भारतानं 8 विकेटनं सामना जिंकत मालिकेत केली बरोबरी

India vs Bangladesh : रोहितचा 'वन मॅन शो'! भारतानं 8 विकेटनं सामना जिंकत मालिकेत केली बरोबरी

दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1नं बरोबरी केली आहे.

  • Share this:

राजकोट, 07 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार कमबॅक केला. बांगलादेशनं दिलेले 154 धावांचे आव्हान भारतानं 16 ओव्हरमध्ये पार केले. पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं 8 विकेटनं जिंकला. यात रोहित शर्मानं दमदार 85 धावांची दमदार खेळी केली. रोहित आपला 100वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळत होता, याच सामन्यात फक्त 23 चेंडूत रोहितनं अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली.

भारतानं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांना चांगली सुरुवात करण्यात आली नाही. खलील अहमद महागात पडल्यानंतर चहलच्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेशचे खेळाडू अडकले. त्यामुळं भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 153 धावांत अडवले. भारताकडून चहलनं 2 विकेट घेतल्या. तर, बांगलादेशनं दिलेल्या 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि धवननं दमदार खेळी केली. दोघांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसं काढत शतकी भागीदारी केली. त्यानंतर धवन 27 चेंडूत 31 धावा करत बाद झाला तर, रोहितनं 43 चेंडूत 85 धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी सामन्याची सांगता केली.

पहिल्याच सामन्यात घडले नाट्यमय प्रकार

चहलच्या 6व्या ओव्हरमध्ये एक अजब प्रकार घडला. चहलच्या तिसऱ्या चेंडूवर लिंटन दास फलंदाजी करत होता. दास मोठा शॉट खेळण्याचा नादात क्रिझ सोडून पुढे गेला तेवढ्यात पंतनं त्याला स्टम्प आऊट केले. पंतनं जोरात केलेल्या अपीलमुळं पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावला आणि दासला नाबाद घोषित करण्यात आले. दास नाबाद होण्यामागचे कारण म्हणजे ऋषभ पंत. आयसीसीच्या नियमानुसार स्टम्पआऊट करताना चेंडू हातात येण्याआधी ग्लोव्ह्ज स्टम्पच्या पुढे नसावेत. पंतबाबत असाच प्रकार घडला. पंतच्या या एका चुकीमुळं भारताला पहिली विकेट मिळाली नाही. पंतचे ग्लोव्ह्ज स्टम्पच्या पुढे असल्यामुळं तिसऱ्या पंचांनी नाबाद घोषित केले. त्यानंतर चहलनं हा टाकलेला चेंडूही नो-बॉल घोषित करण्यात आला.

वाचा-India vs Bangladesh : पंतच्या ‘त्या’ स्टम्पिंगवर रोहितनं भरमैदानात तिसऱ्या पंचांना घातली शिवी, VIDEO VIRAL

बांगलादेशकडून लिंटन दास आणि मोहम्मद नैम यांनी 60 धावांची भागिदारी केली. त्यानंतर सोम्य सरकार आणि मोहम्मदुल्लानं 30 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजांला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं बांगलादेशला 153 धावापर्यंत मजल मारता आली.

वाचा-फलंदाज होता आऊट पण पंतच्या एका चुकीमुळं NOT OUT, पाहा लाजिरवाणा VIDEO

रोहित शर्माची शतकी कामगिरी

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा राजकोटमध्ये बांगलादेशविरोधात मैदानात उतरताच एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. आजचा टी-20 सामना हा रोहित शर्माचा 100वा सामना आहे. 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू आहे.पाकिस्तानचा ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 111 सामने खेळले आहेत. त्यानंतर रोहित शर्मा आणि शाहिद आफ्रिदी यांचा क्रमांक लागतो. या दोन्ही खेळाडूंनी 99 सामने खेळले आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात रोहितनं 99वा सामना खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 98 सामने खेळणाऱ्या धोनीला मागे टाकले होते.

First published: November 7, 2019, 6:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading