India vs Bangladesh : बांगलादेशनं घेतला 10 वर्षांचा बदला, भारतावर 7 विकेटनं विजय

India vs Bangladesh : बांगलादेशनं घेतला 10 वर्षांचा बदला, भारतावर 7 विकेटनं विजय

मुशफिकर रहिमच्या अर्धशतकामुळं तर टीम इंडियाच्या चुकांमळे बांगलादेशनं हा सामना जिंकला.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाची युवा ब्रिगेड सपेशल अयशस्वी ठरली. भारताच्या गोलंदाजांना आणि फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं तब्बल दहा वर्षांनी बांगलादेशनं भारतीय संघावर विजय मिळवला. मुशफिकर रहिमच्या अर्धशतकामुळं बांगलादेशनं 7 विकेटनं हा सामना जिंकला.

भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये दीपक चहरनं लिटन दासला माघारी धाडले. त्यानंतर सौम्य सरकार आणि मोहम्मद नैम यांची जोडी चांगली फलंदाजी करत असताना युजवेंद्र चहलनं मोहम्मद नैमला माघारी पाठवले. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांना कमबॅक करता आला नाही. त्यानंतर मुशफिकर रहिम आणि सौम्य सरकार यांनी अर्धशतकी भागिदारी केली. 17व्या ओव्हरमध्ये खलीली अहमदनं सौम्या सरकारला बाद करत भारताला जिंकण्याची संधी दिली, मात्र पुढच्याच ओव्हरमध्ये कृणाल पांड्येच्या एका चुकीमुळं भारतानं सामना गमावला. चहलच्या 18व्या ओव्हरमध्ये कृणाल पांड्यानं मुशफिकर रहिमचा कॅच सोडला आणि 4 धावा दिल्या. चहलच्या या ओव्हरमध्ये बांगलादेशला 13 धावा मिळाल्या.

बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. आधीच दिल्लीतील वायू प्रदूषणामुळं मैदानावरील वातावरण धुकरट झाले होते. यामुळं पहिल्याच ओव्हरमध्ये शिखर धवन रनआऊट होता होता वाचला. त्यानंतर लगेचच कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर युवा ब्रिगेडकडे सर्वांचे लक्ष असताना केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि शिवम दुबे यांना चांगली फलंदाजी करता आली नाही.

युवा ब्रिगेड फेल

पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवत टीम इंडियानं युवा खेळाडूंना संघात जागा दिली. मात्र कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीली विश्रांती दिल्यामुळं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला केएल राहुल 15 धावा करत बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरनं आक्रमक फलंदाजी करण्यात सुरुवात केली. मात्र सातत्य राखण्यास अपयश आल्यानंतर श्रेयस 22 धावा करत बाद झाला. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शिवम दुबे फक्त 1 धाव करत बाद झाला.

पंतला नक्की झालयं काय?

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली जागा गमावलेल्या ऋषभ पंतला टी-20 क्रिकेटमध्ये स्थान कायम राखावे लागणार आहे. मात्र पहिल्या टी-20 सामन्यात ऋषभ पंतला चांगली फलंदाजी करता आली नाही. संथ सुरुवात केलेल्या पंतनं चौकार मारण्यास सुरुवात केली. मात्र 19व्या ओव्हरमध्ये संघाला जास्त धावांची गरज असताना पंत मोठा शॉट मारण्याच्या नादात बाद झाला. त्यामुळं सोशल मीडियावर पुन्हा एकदा पंतला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.

दहा वर्षांनी बांगलादेशनं जिंकला सामना

भारत-बांगलादेश यांच्यातील रेकॉर्डवर एक नजर टाकल्यास भारतानं नेहमीच बांगलादेशवर राज्य केले आहे. बांगलादेशचे रेकॉर्ड खराब आहेत. आतापर्यंत एकही सामना बांगलादेशनं जिंकला नाही आहे. भारतीय संघानं आतापर्यंत बांगलादेश विरोधात 8 सामने खेळले आहेत. यात भारताचा रेकॉर्ड हा 100 टक्के आहे. दोन्ही संघांमध्ये 2009पासून सामने खेळले जात आहे. शेवटचा टी-20 सामना 2018मध्ये झाला होता. 2018मध्ये झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या तोंडचा घास पळवला होता. दिनेश कार्तिकनं शेवटच्या चेंडूवर सौम्य सरकारला षटकार मारत सामना खिशात घातला. दरम्यान दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशनं 10 वर्षांचा दुष्काळ संपवला. भारतावर 7 विकेटनं विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2019 06:34 PM IST

ताज्या बातम्या