India vs Bangladesh : हा तर मुंबई vs बांगलादेश सामना, ‘या’ मुंबईकरांवर टीम इंडियाची मदार

भारताकडून बांगलादेशविरोधात चार मुंबईकर खेळाडू मैदानात उतरणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 07:18 PM IST

India vs Bangladesh : हा तर मुंबई vs बांगलादेश सामना, ‘या’ मुंबईकरांवर टीम इंडियाची मदार

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर मात देत भारत-बांगलादेश सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून मुंबईकर शिवम दुबे पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघ वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, खलील अहमद या चार गोलंदाजांसोबत मैदानात उतरला आहे.

भारत-बांगलादेश दौऱ्यात विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळं रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यातबरोबर चौथ्या क्रमांकावर मुंबईकर श्रेयस अय्यरवर फलंदाजीची मदार असणार आहे. त्यामुळं टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल चार मुंबईकर खेळाडू आहेत. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या, शिवम दुबे हे चार मुंबईकर खेळाडू टीम इंडियाला या ऐतिहासिक सामन्यात विजय मिळवून देऊ शकतात.

वाचा-बांगलादेशनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, प्रदूषणावर टीम इंडियानं दिली मात

भारताला मिळाला नवा ‘युवी’

आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाकडून 2019मध्ये शिवम खेळला होता. बंगळुरू संघानं शिवमला 5 कोटींना विकत घेतले होते. एका समन्यात पाच चेंडूवर पाच सिक्स शिवाय इतर सामन्यात शिवमला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, अष्टपैलू खेळाडूनं शिवमने विजय हजारे स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले. 26 वर्षीय शिवमनं 48.19च्या सरासरीनं धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याला बांगलादेश विरोधात टी-20 संघात स्थान मिळाले. विजय हजारे स्पर्धेत शिवमनं 67 चेंडूत शानदार अशा 118 धावांची खेळी केली.

वाचा-'5 कोटींसाठी लगावले 5 सिक्स', टीम इंडियाच्या नव्या युवीचा धक्कादायक खुलासा

1000वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना

क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉर्म्याटला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. आयसीसीच्या वतीनं 2005मध्ये पहिल्यांदा टी-20 सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. पहिला टी-20 सामना 7 फेब्रुवारी 2005मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आला होता. त्यामुळं आज भारत-बांगलादेश यांच्यातील हा सामना 1000वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

असे आहे भारत-बांगलादेश टी-20 रेकॉर्ड

भारत-बांगलादेश यांच्यातील रेकॉर्डवर एक नजर टाकल्यास भारतानं नेहमीच बांगलादेशवर राज्य केले आहे. बांगलादेशचे रेकॉर्ड खराब आहेत. आतापर्यंत एकही सामना बांगलादेशनं जिंकला नाही आहे. भारतीय संघानं आतापर्यंत बांगलादेश विरोधात 8 सामने खेळले आहेत. यात भारताचा रेकॉर्ड हा 100 टक्के आहे. दोन्ही संघांमध्ये 2009पासून सामने खेळले जात आहे. शेवटचा टी-20 सामना 2018मध्ये झाला होता. 2018मध्ये झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या तोंडचा घास पळवला होता. दिनेश कार्तिकनं शेवटच्या चेंडूवर सौम्य सरकारला षटकार मारत सामना खिशात घातला. या मालिकेत विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

वाचा-टीक टॉक स्टारनं लीक केला क्रिकेटपटूचा न्यूड व्हिडीओ, सोशल मीडियावर खळबळ

भारत : रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, खलील अहमद.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2019 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...