पंचांना शिवी दिल्यानंतर रोहितची मजेशीर प्रतिक्रिया, ‘पुढच्यावेळी कॅमेरा बघेन आणि...’

पंचांना शिवी दिल्यानंतर रोहितची मजेशीर प्रतिक्रिया, ‘पुढच्यावेळी कॅमेरा बघेन आणि...’

पंतच्या ‘त्या’ स्टम्पिंगवर रोहितनं चक्क तिसऱ्या पंचांना घातली शिवी आता म्हणाला...

  • Share this:

राजकोट, 08 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 8 विकेटनं विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं शानदार खेळी. रोहित शर्माच्या खेळीच्या जोरावर भारतानं सामना जिंकला. रोहितनं या सामन्यात 43 चेंडूत 85 धावा केल्या. यात चार चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

मात्र, या सामन्यात अनेक नाट्यमय प्रकार घडले. भारतीय संघानं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर, चहलच्या 6व्या ओव्हरमध्ये एक अजब प्रकार घडला. चहलच्या तिसऱ्या चेंडूवर लिंटन दास फलंदाजी करत होता. दास मोठा शॉट खेळण्याचा नादात क्रिझ सोडून पुढे गेला तेवढ्यात पंतनं त्याला स्टम्प आऊट केले. मात्र, पंचांनी दासला नाबाद घोषित करण्यात आले. त्याचे कारण होते पंतचा हात हा स्टम्पच्या पुढे होता.

त्यानंतर, मात्र 13व्या ओव्हरमध्येही असाच प्रकार घडला. चहल्याच गोलंदाजीवर सौम्य सरकारला पंतनं स्टम्प आऊट केले. मात्र दासबाबत झालेल्या प्रकारामुळं सौम्य सरकारनं तिसऱ्या पंचांकडे निर्णय मागितला. मात्र यावेळी पंतनं यावेळी कोणतीही चूक केली नाही. तरी स्क्रिनवर चुकून नॉट आऊटचा निर्णय आला. मात्र ही चूक कळताच मैदानावरच्या पंचांनी सौम्य सरकारला बाद घोषित केले. या सगळ्या प्रकारावर भडकलेल्या रोहित शर्मानं मैदानात तिसऱ्या पंचांना शिवी घातली. हा व्हिडीओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

याबाबत आता रोहितनं सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितनं, “मी मैदानावर खुप भावनिक असतो. कोणत्याही परिस्थितीत लक्ष्य पूर्ण करणे हे माझे ध्येय असते. मैदानावर असे प्रसंग घडत असतात, ज्यावेळी तुम्ही खुप भावनिक असता. पुढच्या वेळी मी कॅमेरा पाहून असं करत जाईन, अशी प्रतिक्रिया देत हसला.

दुसऱ्या या सामन्यात भारतानं दमदार कमबॅक केला. बांगलादेशनं दिलेले 154 धावांचे आव्हान भारतानं 16 ओव्हरमध्ये पार केले. पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं 8 विकेटनं जिंकला. यात रोहित शर्मानं दमदार 85 धावांची दमदार खेळी केली. रोहित आपला 100वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळत होता, याच सामन्यात फक्त 23 चेंडूत रोहितनं अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 02:56 PM IST

ताज्या बातम्या