India vs Bangladesh : रोहित शर्माच्या लकी चार्मला घाबरला ‘गब्बर’, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

India vs Bangladesh : रोहित शर्माच्या लकी चार्मला घाबरला ‘गब्बर’, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

असं काय झालं की रोहित शर्माच्या लकी चार्मला घाबरला शिखर.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर : भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात भारताला चांगली फलंदाजी करता आली नाही. जगातले सर्वोत्तम आणि खतरनाक फिरकीपटू म्हणून ओळखले जाणार रोहित शर्मा आणि शिखर धवन विशेष चांगली खेळी करू शकले नाही. पहिल्या टी-20 सामन्यात रोहित 9 तर शिखर 41 धावांवर बाद झाला.

भारतीय संघाची जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानावर जेवढे चर्चेत असतात तेवढेच मैदानाबाहेरही. रोहित आणि शिखर यांचे मैदानाबाहेरही चांगले संबंध आहे. सोशल मीडियावर नेहमीच शिखर आणि रोहित यांची मैत्री दिसून येते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रोहितची लकी चार्म म्हणजे त्याची लेक समायरा हिच्याशी शिखर धवन खेळत आहे. समायरा आणि शिखर एकमेकांसोबत छान मस्ती करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

वाचा-रोहित शर्मानं मोडला धोनी आणि विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण ट्विटरवर झाला ट्रोल

 

View this post on Instagram

 

Some masti with adorable Samaira ❤ @rohitsharma45

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

वाचा-हा तर मुंबई vs बांगलादेश सामना, ‘या’ मुंबईकरांवर टीम इंडियाची मदार

शिखर धवननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समायरला रोहित शर्माच्यासोबत बसून धवनच्या केसांसोबत खेळत आहे. समायरानं स्पर्श केल्यानंतर घाबरून धवन झोपतही आहे, याचा आनंद समायरा आणि रोहितसह धवनेही घेतला.

वाचा-भारताची यंग ब्रिगेड फेल! बांगलादेशला 149 धावांचे आव्हान

1000वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना

क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉर्म्याटला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. आयसीसीच्या वतीनं 2005मध्ये पहिल्यांदा टी-20 सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. पहिला टी-20 सामना 7 फेब्रुवारी 2005मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आला होता. त्यामुळं आज भारत-बांगलादेश यांच्यातील हा सामना 1000वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 09:19 PM IST

ताज्या बातम्या