मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : 'मला कोणी त्या लायकच समजलं नाही', अश्विनची खंत

IND vs AUS : 'मला कोणी त्या लायकच समजलं नाही', अश्विनची खंत

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) त्यांच्याच मायभूमीत 2-1 ने पराभव केला. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीमध्ये ऑफ स्पिनर आर.अश्विन (R. Ashwin) याने मोलाची भूमिका बजावली.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 26 जानेवारी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) त्यांच्याच मायभूमीत 2-1 ने पराभव केला. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीमध्ये ऑफ स्पिनर आर.अश्विन (R. Ashwin) याने मोलाची भूमिका बजावली. 3 मॅचमध्ये त्याने बॅट आणि बॉलने चमकदार कामगिरी केली. पण या विजयानंतरही अश्विनने त्याची खंत बोलून दाखवली आहे. सीरिज सुरू व्हायच्या आधी प्रत्येक जण स्मिथ (Steve Smith) ला कोण आऊट करणार? याबाबत चर्चा करत होतं, पण कोणीही मला त्याची विकेट घेण्याच्या लायक समजलं नाही, असं अश्विन म्हणाला आहे.

आर.अश्विन क्रिकबझशी बोलत होता. 'माझ्या बॉलिंगबाबत वारंवार चर्चा होत होती. माझी तुलना नॅथन लायनशी केली जात होती. मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही ऍडलेड टेस्टमध्ये मी 6 विकेट घेतल्या होत्या, पण मॅचनंतर लायन माझ्यापेक्षा चांगला बॉलर असल्याचं सांगण्यात आलं. लायन चांगला बॉलर आहे, पण माझ्या कामगिरीकडे दुर्लक्ष केलं गेलं, ज्यामुळे मी निराश झालो,' अशी प्रतिक्रिया अश्विनने दिली.

'माझं लक्ष्य टेस्ट सीरिजमध्ये स्मिथची विकेट घेण्यावर होतं, कारण तो ऑस्ट्रेलियात स्पिनरविरुद्ध आऊट होत नाही. मला हे रेकॉर्ड बदलायचं होतं. प्रत्येक जण स्मिथची विकेट कोण घेईल, याबाबत बोलत होते. पण कोणीही माझं नाव घेतलं नाही. सीरिजनंतर लोकांनी माझी चर्चा करावी, हे मी ठरवलं होतं,' असं वक्तव्य अश्विनने केलं.

अश्विनने टेस्ट सीरिजमध्ये 3 वेळा स्मिथची विकेट घेतली. सगळ्यात पहिले ऍडलेड टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये अश्विनने स्मिथला माघारी पाठवलं. यानंतर मेलबर्न आणि सिडनी टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही अश्विनने स्मिथची विकेट घेतली. टेस्ट सीरिजमध्ये अश्विनने मला त्रास दिल्याचं स्मिथने कबूल केलं.

First published: