मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : शतक ठोकणारा स्मिथ म्हणतो, '3 दिवसांपूर्वी काहीतरी झालं आणि...'

IND vs AUS : शतक ठोकणारा स्मिथ म्हणतो, '3 दिवसांपूर्वी काहीतरी झालं आणि...'

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला स्टीव्ह स्मिथ (Steve Smith).

  • Published by:  Shreyas

सिडनी, 28 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला स्टीव्ह स्मिथ (Steve Smith). स्मिथ याने 62 बॉलमध्येच शतक ठोकत ऑस्ट्रेलियालाल 374 रनपर्यंत पोहोचवलं. या कामगिरीमुळे स्मिथला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. यानंतर बोलताना स्टीव्ह स्मिथने आपण फॉर्ममध्ये परत कसे आलो, याबाबत सांगितलं. मागच्या काही दिवसांपासून मला लय सापडत नव्हती, पण तीन दिवसांपूर्वी वेगळ्याच गोष्टी घडल्या आणि मी या मॅचमध्ये शतक केल्याचं स्मिथ म्हणाला.

'मागच्या काही महिन्यांपासून मी लय शोधायचा प्रयत्न करत होतो. पण तीन दिवसांपूर्वी माझ्यासोबत वेगळं घडलं. माझी लय परत आली आणि मला पुन्हा आधीसारखं वाटायला लागलं,' अशी प्रतिक्रिया स्मिथने दिली.

कोरोना व्हायरसनंतर स्मिथ आयपीएलमध्ये खेळत होता, पण राजस्थानकडून खेळताना त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. सिडनीमध्ये स्मिथ 8 महिन्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी खेळत होता. वॉर्नरची विकेट गेल्यानंतर स्मिथने फिंचसोबत किल्ला लढवला. फक्त 36 बॉलमध्येच त्याने अर्धशतक केलं, यानंतर पुढच्या 35 बॉलमध्ये स्मिथने शतकही पूर्ण केलं. स्मिथने फिंचसोबत 108 रन आणि मॅक्सवेलसोबत 57 रनची पार्टनरशीप केली. सोबतच त्याने शेवटच्या काही ओव्हरमध्ये ऍलेक्स केरीसोबत 41 रनची पार्टनरशीपही केली. स्मिथच्या कारकिर्दीतलं हे सगळ्यात जलद शतक होतं.

First published: