मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : युझवेंद्र चहलच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

IND vs AUS : युझवेंद्र चहलच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्याची सुरुवात खराब झाली आहे. या मॅचमध्ये भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

सिडनी, 27 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्याची सुरुवात खराब झाली आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 375 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 ओव्हरमध्ये 308/8 एवढाच स्कोअर करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियन बॅट्समनने भारतीय बॉलरवर आक्रमण करत मोठी धावसंख्या उभारली.

या मॅचमध्ये भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. चहल वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन देणारा भारतीय स्पिनर बनला आहे. या यादीमध्ये चहलच्या पुढे विनय कुमार आणि भुवनेश्वर कुमार आहेत. चहलने आपल्या 10 ओव्हरमध्ये तब्बल 89 रन दिल्या.

मागच्याच वर्षी चहल स्पिनर म्हणून सर्वाधिक रन देणारा भारतीय बॉलर बनला होता. चहलने पियुष चावला याला मागे टाकलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये चहलने 88 रन दिले होते, त्यामुळे चहलने या मॅचमध्ये स्वत:च्याच वाईट विक्रमाला मागे टाकलं. तर चावलाने 2008 साली पाकिस्तानविरुद्ध ढाक्यामध्ये 85 रन दिले होते.

चहलने त्याच्या बॉलिंगवेळी 5 फोर आणि 5 सिक्स दिल्या. याशिवाय त्याने 3 वाईड आणि एक नो बॉल टाकला. चहलने त्याच्या वनडे कारकिर्दीमध्ये तिसऱ्यांदा 80 किंवा त्यापेक्षा जास्त रन दिल्या आहेत. मागच्यावर्षी वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध चहलने 88 तर मागच्याच वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीमध्ये त्याने 80 रन दिले होते.

भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक रन द्यायचा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. भुवनेश्वरने 2015 साली मुंबईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 106 रन दिले होते. यानंतर विनय कुमार याने 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 ओव्हरमध्ये 102 रन दिले होते. तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमारनेच न्यूझीलंडविरुद्ध 2017 साली कानपूरमध्ये 10 ओव्हरमध्ये 92 रन दिले होते. या यादीत पाचव्या क्रमांकावर चहल आला आहे.

एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन देण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिक लुईसच्या नावावर आहे. लुईसने 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 ओव्हरमध्ये 113 रन दिले होते. यानंतर लुईस कधीही ऑस्ट्रेलियाकडून खेळला नाही. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानच्या वहाब रियाझचा नंबर लागतो. रियाझने इंग्लंडविरुद्ध 110 रन दिले होते. तर अफगाणिस्तानच्या राशिद खानही 110 रनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

First published: