सिडनी 9 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs Australia) दुखापतींनी ग्रासलं आहे. सिडनी टेस्टमध्येही ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांना दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. या दोघांनाही ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरचे बॉल लागले आहेत, त्यामुळे दोघं स्कॅनिंगसाठी गेले आहेत. या दुखापतीमुळे दोघांचं उरलेल्या सामन्यात आणि चौथ्या टेस्टमध्ये खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
आयसीसीचा नियम भारताच्या पथ्यावर
आयसीसीच्या नव्या नियमामुळे भारताने मैदानात ऋषभ पंतच्याऐवजी ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याला मैदानात उतरवलं. 1980 ते 2017 या सबस्टिट्युट खेळाडूला विकेट कीपिंगची परवानगी नव्हती. पण या नियमांमध्ये ऑक्टोबर 2017 साली बदल करण्यात आले, त्यामुळे सबस्टिट्युट फिल्डरला विकेट कीपिंग करण्याचा मार्ग मोकळा झाला. पण असं असलं तरी मैदानातल्या अंपायरने या नियमाचा कोणी गैरफायदा तर घेत नाही, ना याची दक्षता घ्यावी लागते.
या नियमाचा सगळ्यात पहिले फायदा भारतानेच घेतला. दक्षिण आफ्रिकेत 2018 साली जोहान्सबर्ग टेस्टमध्ये पार्थिव पटेलला दुखापत झाली होती, त्यामुळे दिनेश कार्तिक विकेट कीपिंगचे ग्लोव्हज घालून मैदानात उतरला. सबस्टिट्युट फिल्डर बॉलिंग किंवा बॅटिंग, तसंच नेतृत्व करू शकत नाही, फक्त कनकशन (डोक्याला बॉल लागला तर) सबस्टिट्युटच बॅटिंग किंवा बॉलिंग करू शकतो.
पॅट कमिन्सने टाकलेल्या बॉलवर खेळताना पंतल्या कोपराला दुखापत झाली. यानंतर टीम इंडियाचा फिजियोथेरपिस्ट मैदानात आला आणि त्याने पंतवर प्राथमिक उपचार केले. फिजियोच्या उपचारांनंतर पंतने पुन्हा बॅटिंगलाही सुरूवात केली. पण या दुखापतीनंतर त्याची लय गेली. 67 बॉलमध्ये 36 रन करून पंत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने पुजारासोबत अर्धशतकीय पार्टनरशीप केली होती.
ऋषभ पंत याच्यानंतर रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) ही दुखापत झाली. बॅटिंग करत असताना मिचेल स्टार्कने टाकलेला बॉल जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला. दुखापतीनंतर जडेजानेही पंतप्रमाणेच बॅटिंग सुरू ठेवली. 37 बॉलमध्ये 28 रन करून जडेजा नाबाद राहिला. पण इनिंग संपल्यानंतर त्यालाही स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं
जडेजा जर या मॅचमध्ये खेळला नाही, तर तो टीमसाठी मोठा धक्का असेल. कारण पहिल्या इनिंगमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट घेतल्या होत्या. तसंच जबरदस्त फिल्डिंग करत स्मिथला रन आऊट केलं होतं.
या दौऱ्यामध्ये टीम इंडियाच्या बऱ्याच खेळाडूंना दुखापत झाली. मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल हे तीनही खेळाडू दुखापतीमुळे दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.