Home /News /sport /

IND vs AUS : 26 डिसेंबरला सुरू होणाऱ्या मॅचला बॉक्सिंग डे टेस्ट का म्हणतात? जाणून घ्या कारण

IND vs AUS : 26 डिसेंबरला सुरू होणाऱ्या मॅचला बॉक्सिंग डे टेस्ट का म्हणतात? जाणून घ्या कारण

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. 26 डिसेंबरला सुरू होणाऱ्या या टेस्ट मॅचला बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) म्हणलं जातं.

    मेलबर्न, 22 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. 26 डिसेंबरला सुरू होणाऱ्या या टेस्ट मॅचला बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) म्हणलं जातं. बॉक्सिंग डे टेस्टचा इतिहास 128 वर्ष जुना आहे. पण बॉक्सिंग डे याचा अर्थ कुस्तीशी संबंधित नाही. जगातल्या अनेक देशांमध्ये ख्रिसमसच्या पुढच्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबरला बॉक्सिंग डे म्हणलं जातं. या दिवशी लोकं आपला मित्र परिवार आणि नातेवाईकांना भेटतात आणि त्यांना बॉक्समध्ये भेटवस्तू देतात. ही परंपरा या भागात शेकडो वर्षांपासून सुरू आहे. ख्रिसमस बॉक्सच्या नावावरून याचं नाव बॉक्सिंग डे टेस्ट असं पडलं आहे. 1892 साली शेफिल्ड शील्डची एक मॅच मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवली गेली. यानंतर व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यात ख्रिसमसदरम्यान क्रिकेट खेळण्याची परंपरा सुरू झाली. मेलबर्नमध्ये 1980 च्या आधी 1952, 1968, 1974 आणि 1975 साली चार टेस्ट मॅच खेळल्या गेल्या. याशिवाय 1967, 1972 आणि 1976 मध्ये ऍडलेडवर बॉक्सिंग डे टेस्ट खेळवली गेली. 1975 साली क्वाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे टेस्ट मॅच पाहायला जवळपास 85 हजार प्रेक्षक आले होते. या मॅचच्या पाच वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट खेळवायला सुरूवात केली. बॉक्सिंग डे टेस्ट फक्त ऑस्ट्रेलियातच नाही तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतही खेळवल्या जातात.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या