IND vs AUS : कोण होणार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार? 3 खेळाडूंमध्ये स्पर्धा

IND vs AUS : कोण होणार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार? 3 खेळाडूंमध्ये स्पर्धा

भारताविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर (India vs Australia) ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याला हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

  • Share this:

ब्रिस्बेन, 13 जानेवारी : भारताविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर (India vs Australia) ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याला हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सीरिजमध्ये टीम पेननची कामगिरी आणि वर्तणुकीवर अनेकांनी टीका केली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनीही आता टीम पेनच्या नेतृत्वाचे अवघे काही दिवस बाकी असल्याचं वक्तव्य केलं. पेनने सिडनी टेस्टमध्ये हनुमा विहारी आणि आर.अश्विन यांची जोडी तोडण्यासाठी स्लेजिंग केलं.

स्लेजिंगसोबतच त्याने काही कॅचही सोडले, त्यामुळे पेनला बाहेर करण्यात यावं, अशी मागणी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट चाहत्यांकडून होत आहे. टीम पेन याला कर्णधारपदावरून हटवलं, तर ऑस्ट्रेलियाकडे सध्या तीन पर्याय उपलब्ध आहेत.

स्टीव्ह स्मिथ : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यामध्ये आघाडीवर आहे. 2018 साली दक्षिण आफ्रिकेत बॉलशी छेडछाड केल्यामुळे स्मिथवर वर्षभराची बंदी घालण्यात आली, तसंच त्याचं कर्णधारपदही काढून टाकण्यात आलं. आता स्मिथचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. स्मिथकडे क्रिकेटचा अनुभवही आहे. मार्क वॉ यानेही स्मिथला पुन्हा कर्णधार करावं, अशी मागणी केली आहे. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मात्र स्मिथला पुन्हा कर्णधार करणार नाही, असे संकेत दिले आहेत. काही तरुण खेळाडू पुढे येत आहेत, ज्यांच्याकडे नेतृत्व करण्याचे गुण आहेत, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात येत आहे. या वक्तव्यामुळे स्मिथ नेतृत्वासाठी पहिली पसंती नसेल, असंच म्हणावं लागेल.

पॅट कमिन्स : जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथला नेतृत्व दिलं नाही तर दुसरा दावेदार पॅट कमिन्स (Pat Cummins) आहे. कमिन्स हा सध्या ऑस्ट्रेलियाच्या टीमचा उपकर्णधार आहे. तसंच तो टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकाचा बॉलरही आहे. त्यामुळे कमिन्सची दावेदारी मजबूत आहे.

मार्नस लाबुशेन : ऑस्ट्रेलियाची टीम भविष्याचा विचार करत असेल, तर मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याच्या गळ्यातही नेतृत्वाची माळ पडू शकते. लाबुशेनचा अनुभव कमी पडला तर त्याला सध्या उपकर्णधार बनवून तयारही केलं जाऊ शकतं.

Published by: Shreyas
First published: January 13, 2021, 2:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading