मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरची जिगरबाज खेळी, पण ही व्यक्ती नाराज

IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरची जिगरबाज खेळी, पण ही व्यक्ती नाराज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs Australia) वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) ने केलेल्या जिगरबाज खेळीचं सगळेच कौतुक करत आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs Australia) वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) ने केलेल्या जिगरबाज खेळीचं सगळेच कौतुक करत आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs Australia) वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) ने केलेल्या जिगरबाज खेळीचं सगळेच कौतुक करत आहेत.

ब्रिस्बेन, 18 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs Australia) वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) ने केलेल्या जिगरबाज खेळीचं सगळेच कौतुक करत आहेत. पण वॉशिंग्टन सुंदरचे वडिल मात्र त्याला शतक करता आलं नाही म्हणून नाराज आहेत. ब्रिस्बेन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरने 144 बॉलमध्ये 62 रन केले. सातव्या विकेटसाठी सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांच्यात 123 रनची पार्टनरशीप झाली. शार्दुलने त्याच्या टेस्ट कारकिर्दीमधलं पहिलंच अर्धशतक केलं. 67 रन करून ठाकूर आऊट झाला. या दोघांच्या पार्टनरशीपमुळे भारताने 336 रनपर्यंत मजल मारली.

सुंदरच्या या खेळीबद्दल त्याचे वडिल एम सुंदर यांना विचारण्यात आलं. 'मी निराश आहे, कारण त्याने 100 रन केले नाहीत. सिराज येताच त्याने फोर-सिक्स मारायला पाहिजे होत्या. यात तो सक्षम आहे. त्याने सिक्स मारण्यासाठी गेलं पाहिजे होतं. तो पूल आणि मोठे शॉट मारू शकतो. मी रोज त्याच्याशी बोलतो. त्याने संधी मिळणार आहे, हे सांगितल्यावर मोठा स्कोअर कर, असं मी त्याला बोललो,' अशी प्रतिक्रिया सुंदरच्या वडिलांनी दिलं.

वॉशिंग्टन सुंदरने फक्त 12 प्रथम श्रेणी मॅच खेळल्या आहेत. त्याने 2016-17 च्या रणजी ट्रॉफीमध्ये तामीळनाडूकडून खेळताना आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईविरुद्ध ओपनिंगला बॅटिंग केली होती. सुंदरने अभिनव मुकुंदसोबत 107 रनची पार्टनरशीप केली होती. तर त्रिपुराविरुद्धच्या मॅचमध्ये ओपनिंग करताना त्याने 156 रन केले होते. या कामगिरीनंतरही सुंदर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ तामीळनाडूच्या टीममधून बाहेर आहे.

2017 च्या दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये सुंदरने 11 विकेट (5/94 आणि 6/87) घेतल्या. तर बॅटिंगमध्ये त्याने 130 रन (पहिल्या इनिंगमध्ये 88 आणि दूसऱ्यामध्ये 42) केले होते. ज्यामुळे इंडिया रेडने इंडिया ब्लूचा पराभव केला होता. दुलीप ट्रॉफीच्या या कामगिरीनंतर सुंदरची टेस्ट टीममध्ये निवड होईल, असं वाटत होतं, पण त्याला संधी न मिळाल्यामुळे आम्ही नाराज झालो.

या मॅचमध्ये सुंदरने पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेटही घेणाऱ्या सुंदरने अर्धशतकही केलं. पदार्पणाच्या टेस्टमध्ये ही कामगिरी करणारा सुंदर तिसरा भारतीय आहे.

First published: