ब्रिस्बेन, 13 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये चौथ्या टेस्टला सुरूवात होणार आहे. तीन टेस्ट मॅचनंतर ही सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे, त्यामुळे चौथी टेस्ट निर्णायक असणार आहे. तिसरी टेस्ट ड्रॉ करून भारताने ही सीरिज अधिक रोमांचक केली आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) च्या नेतृत्वात टीम इंडिया जेव्हा चौथी टेस्ट खेळण्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा त्यांच्यापुढे टीम निवड आणि खेळाडूंच्या फिटनेसचं मोठं आव्हान असेल.
दुखापतीमुळे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आधीच चौथ्या टेस्टमधून बाहेर झाला आहे, तर जसप्रीत बुमराह, मयंक अगरवाल आणि आर. अश्विन दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे भारतीय टीममध्ये खूप बदल केले जाऊ शकतात. अश्विन चौथ्या टेस्टसाठी फिट झाला तर भारतीय टीम सहा बॅट्समन आणि पाच बॉलर घेऊन मैदानात उतरेल, ज्यात दोन स्पिन बॉलिंग ऑलराऊंडरचा समावेश असेल.
अश्विनशिवाय चौथ्या टेस्टमध्ये जडेजाच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) ला संधी मिळू शकते. ब्रिस्बेन टेस्टमधून वॉशिंग्टन सुंदर टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. आयपीएल आणि मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये सुंदरने चांगली कामगिरी केली होती. तसंच सुंदर बॅटिंगमध्येही मोलाची कामगिरी करू शकतो, त्यामुळे त्याला खेळवण्याबाबत भारतीय टीम सकारात्मक असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली तर ऋद्धीमान साहा याला मात्र बाहेरच बसावं लागू शकतं. तसंच अश्विन जर वेळेत फिट झाला नाही, तर त्याच्याऐवजी कुलदीप यादव टीममध्ये येईल.
टीम इंडियाकडे उरले हे खेळाडू
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर
या खेळाडूंच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह
मयंक अगरवाल, आर.अश्विन