IND vs AUS : विराट कोहलीवर आशिष नेहराने साधला निशाणा, म्हणाला कर्णधार म्हणून...

IND vs AUS : विराट कोहलीवर आशिष नेहराने साधला निशाणा, म्हणाला कर्णधार म्हणून...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिज (India vs Australia) मध्ये भारताचा पहिल्या दोन्ही मॅचमध्ये पराभव झाला, त्यामुळे भारताने वनडे सीरिज गमावली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा (Ashish Nehra) याने विराट कोहली (Virat Kohli) वर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिज (India vs Australia) मध्ये भारताचा पहिल्या दोन्ही मॅचमध्ये पराभव झाला, त्यामुळे भारताने वनडे सीरिज गमावली आहे. सीरिज गमावल्यानंतर टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)वर टीका करण्यात येत आहे. तीन मॅचच्या सीरिजची पहिली मॅच भारताने 66 रनने तर दुसरी मॅच 51 रनने गमावली. भारतीय बॉलरच्या खराब कामगिरीमुळे भारताला पराभवाची नामुष्की ओढावली.

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा (Ashish Nehra) याने विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. विराट कोहली आवेशात येऊन निर्णय घेतो, असं आशिष नेहरा म्हणाला आहे. सोबतच विराटने दुसऱ्या वनडेवेळी बॉलिंगमध्ये केलेल्या बदलांवरही नेहराने टीका केली आहे. विराट कोहलीने घाईमध्ये निर्णय घेतले, ज्याला काहीच अर्थ नव्हता, असंही नेहरा म्हणाला.

'दुसऱ्या वनडेमध्ये विराटने मोहम्मद शमीला दोन ओव्हर दिल्या आणि मग नवदीप सैनीला बोलावलं. शमीने दुसऱ्या बाजूने बॉलिंग करावी, असं विराटला वाटत होतं. हे मी समजू शकतो, फण नवीन बॉलने फक्त दोन ओव्हरसाठीच बुमराहचा उपयोग का केला? विराट बॉलिंगमध्ये वारंवार बदल करत आहे. त्याच्याकडे बॉलिंगसाठी पाचच पर्याय आहेत. भारताने मयंक अग्रवाल आणि हार्दिक पांड्याचा वापर केला, पण या मैदानात घेतलेला निर्णय होता,' अशी प्रतिक्रिया नेहराने दिली.

'विराटने 87 बॉलमध्ये 89 रन केले, तरी तो जुना विराट वाटला नाही. विराट आव्हानाचा पाठलाग करताना घाई करत होता. भारत 475 रनच्या आव्हानाचा पाठलाग करत आहे, असं वाटत होतं. विराट निर्णय घेताना घाई करत आहे. पहिल्या वनडेमध्ये विराटने कॅच सोडल्यानंतरही तो घाईत दिसला. त्याने 350 रनच्या आव्हानाचा पाठलाग कारकिर्दीमध्ये अनेकदा केला आहे. बॉलिंगमध्ये तो खूप जास्त बदल करत आहे, याठिकाणी त्याने नीट लक्ष देण्याची गरज आहे,' असं मत आशिष नेहराने मांडलं.

Published by: Shreyas
First published: December 1, 2020, 2:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या