IND vs AUS : भारताला धक्का, आणखी एक खेळाडू टेस्ट सीरिजमधून बाहेर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट आधी टीम इंडियाला (India vs Australia) आणखी एक धक्का लागला आहे. फास्ट बॉलर उमेश यादव (Umesh Yadav) उरलेल्या दोन्ही मॅचमध्ये खेळू शकणार नाही, असं वृत्त एनएनआयने दिलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट आधी टीम इंडियाला (India vs Australia) आणखी एक धक्का लागला आहे. फास्ट बॉलर उमेश यादव (Umesh Yadav) उरलेल्या दोन्ही मॅचमध्ये खेळू शकणार नाही, असं वृत्त एनएनआयने दिलं आहे.

  • Share this:
    मेलबर्न, 31 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट आधी टीम इंडियाला (India vs Australia) आणखी एक धक्का लागला आहे. फास्ट बॉलर उमेश यादव (Umesh Yadav) उरलेल्या दोन्ही मॅचमध्ये खेळू शकणार नाही, असं वृत्त एनएनआयने दिलं आहे. उमेश यादव बुधवारी रात्रीच भारतात रवाना झाल्याचंही सांगण्यात येत आहे. आता त्याचं लक्ष्य इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी पूर्णपणे फिट होणं हे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न टेस्टच्या तिसऱ्या दिवशी उमेश यादवला दुखापत झाली होती. पोटरीला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. टी नटराजनला संधी? दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये उमेश यादव लयीमध्ये होता. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने जो बर्न्सला माघारी धाडलं, या इनिंगमध्ये त्याला फक्त 3.3 ओव्हरच करता आल्या. आता तिसऱ्या टेस्टमध्ये उमेश यादवच्याऐवजी टी नटराजन (T.Natrajan) याला संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये नटराजन याने दिमाखदार कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्य वनडे सीरिजमधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये नटराजन याने 70 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये नटराजनला 6 विकेट मिळाल्या. याआधी मोहम्मद शमीला देखील पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान हाताला बॉल लागल्यामुळे दुखापत झाली होती, त्यामुळे तोदेखील टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला होता. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी इशांत शर्मालादेखील दुखापत झाल्यामुळे तोही या दौऱ्याला मुकला.
    Published by:Shreyas
    First published: