Home /News /sport /

U19 Ind Vs Aus : भारतीय यंग ब्रिगेडची कमाल, ऑस्ट्रेलियाला लोळवून सेमीफायनलमध्ये धडक

U19 Ind Vs Aus : भारतीय यंग ब्रिगेडची कमाल, ऑस्ट्रेलियाला लोळवून सेमीफायनलमध्ये धडक

आतापर्यंत अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये 3 वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा खेळ खल्लास झाला आहे.

    पोचेफ्स्ट्रूम, 28 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या यंग ब्रिगेडने धडाकेबाजी कामगिरी केली आहे. अंडर 19 भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा 74 धावांनी धुव्वा उडवत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  पहिले फलंदाजी करत भारतीय संघाने 233 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताकडून  अथर्व अंकोलेकरने नाबाद 55 धावांची खेळी केली तर सलामीची फलंदाज यशस्वी जयस्वालने 82 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकार लगावत 62 धावा करून बाद झाला. पण दिव्यांश सक्सेना 14 धावांवर झटपट बाद झाला. त्यानंतर एक एक करून गडी बाद होत गेले. कर्णधार प्रियम गर्ग सुद्धा 5 धावा करून बाद झाला. तर  तिलक वर्मा (2)  आणि ध्रुव जुरेल (15) धावा करू शकले. त्यानंतर अथर्व अंकोलेकरने आणि रवी बिश्नोई दोघांनी संयमी खेळी करून भारताचा डाव सावरला. दोघांच्या भागिदारीमुळे भारताने 200 धावांचा टप्पा पार केला. अखेर 9 गडी बाद होतं भारताने ऑस्ट्रेलियाला 234 धावांचं आव्हान दिलं. परंतु,  234 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 159 धावांवर गारद झाला.  भारतीय संघाच्या कार्तिक त्यागीने भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याने अवघ्या 22 धावा देऊन 4 गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला सुरुंग लावला. तर आकाश सिंहने 30 धावा देत 3 गडी बाद केले. या विजयासह भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. तर आतापर्यंत अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये 3 वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा खेळ खल्लास झाला आहे. IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये आणखी एक विजय आणि विराटसेना रचणार इतिहास! जागतिक क्रिकेटमध्ये यशाचे अनेक झेंडे गाढणारा भारतीय क्रिकेट संघ आज न्यूझीलंडविरुद्ध तिसरा टी -20 आंतरराष्ट्रीय खेळणार आहे. याआधी दोन सामना भारतानं एकहाती जिंकले. मात्र तिसरा सामना जिंकत परदेशी भूमीवर भारतीय संघ इतिहास रचेल. या मालिकेच्या पहिल्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने न्यूझीलंडला 6 गडी राखून पराभूत केले. यानंतर भारताने दुसरा टी -20 सामना 7 गडी राखून जिंकला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे भारताने तिसरा टी -20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकल्यास न्यूझीलंडच्या भूमीवर एक इतिहास रचला जाईल. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत न्यूझीलंडच्या भूमीवर प्रथमच टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकेल. भारताने आतापर्यंत एकही मालिका न्यूझीलंडमध्ये जिंकलेली नाही. त्यामुळे या सामन्यात विजयासह विराटसेना एक इतिहास रचेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या टी -20 मालिकेपूर्वी फक्त दोन टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. या दोन्ही टी -20 मालिकेत न्यूझीलंडकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. 2008-2009मध्ये एक टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली गेली होती. या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताला 0-2ने पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर, 2018-2019 मध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेत न्यूझीलंडकडून भारताचा 2-1 असा पराभव झाला. असा आहे भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर. असा आहे न्यूजीलंडचा संघ: केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगलेइजन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सीफर्ट (विकेटकीपर), हैमिश बेनेट, ईश सोढ़ी, टिम साउथी, ब्लेयर टिकनर.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या