IND vs AUS : टेस्ट सीरिजनंतर टीम पेनची गच्छंती, गावसकरांची मोठी भविष्यवाणी

IND vs AUS : टेस्ट सीरिजनंतर टीम पेनची गच्छंती, गावसकरांची मोठी भविष्यवाणी

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली सिडनीमधली तिसरी टेस्ट मॅच ड्रॉ झाली. यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याच्यावर टीका केली.

  • Share this:

सिडनी, 12 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली सिडनीमधली तिसरी टेस्ट मॅच ड्रॉ झाली. यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याच्यावर टीका केली. मॅच सुरू असताना टीम पेनने केलेलं अश्विनचं स्लेजिंग अनुचित होतं, यामुळे त्याची कर्णधारपदावरून गच्छंती होऊ शकते, अशी भविष्यवाणी सुनिल गावसकर यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियाने मॅचच्या शेवटच्या दिवशी पुरेपूर प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी भारतीय बॅट्समनसमोर अडचणी निर्माण केल्या नाहीत. भारतीय बॅट्समननी धैर्य दाखवत टेस्ट ड्रॉ केली.

इंडिया टुडेशी बोलताना गावसकर म्हणाले, 'मला माहिती नाही, मी ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीमध्ये नाही, पण कर्णधार म्हणून त्याच्याकडे कमी दिवस बाकी आहेत. भारतीय टीमला तुम्ही जास्त विकेट न गमावता 130 ओव्हर बॅटिंग करू देता. ऑस्ट्रेलियाची बॉलिंग चांगली आहे. तुम्हाला बॉलिंगमध्ये बदल आणि फिल्डरना योग्य ठिकाणी ठेवून निकाल बदलू शकला असता.'

पेनने स्वत: हनुमा विहारीचा कॅच सोडला. विहारीने 161 बॉलमध्ये नाबाद 23 रन तर अश्विनने 128 बॉलमध्ये नाबाद 39 रन केले. या दोघांमध्ये 62 रनची पार्टनरशीप झाली, ज्यामुळे मॅच ड्रॉ झाली. शेवटच्या सत्रात विकेट मिळत नसल्यामुळे हताश झालेल्या टीम पेनने अश्विनला छेडलं, पण यामध्ये पेनचंच लक्ष विचलित झालं आणि त्याने विहारीचा कॅच सोडला.

'पेनने फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये बदल करण्याऐवजी बॅट्समनशी बोलत होता. सीरिज संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कर्णधार बदलला, तर मला आश्चर्य वाटणार नाही,' अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.

टीम पेनने या मॅचमध्ये तीन कॅच सोडले. विहारीच्याआधी त्याने ऋषभ पंतला दोनवेळा जीवनदान दिलं. 'तुम्ही सोपे कॅच सोडता, दोनवेळा ऋषभच्या बॅटच्या कडेला बॉल लागला, ते कॅच कठीण नव्हते. विहारीचा कॅच स्लिपमधला फिल्डर पकडू शकला असता,' असं गावसकर म्हणाले.

टीम पेन यानेही कॅच सोडल्यामुळे मॅचच्या निकालावर परिणाम झाल्याचं मान्य केलं. निकाल कोणत्याही बाजूने लागू शकला असता, पण मी निराश आहे. माझ्या विकेट कीपिंगचा मला अभिमान आहे, पण आज माझ्या कारकिर्दीतला सगळ्यात खराब दिवस होता.

Published by: Shreyas
First published: January 12, 2021, 9:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading