मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : पंत-जडेजा बॅटिंग करणार का नाही? सिडनीमधून आली मोठी UPDATE

IND vs AUS : पंत-जडेजा बॅटिंग करणार का नाही? सिडनीमधून आली मोठी UPDATE

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सिडनीमध्ये तिसरी टेस्ट मॅच सुरू आहे. या मॅचमध्ये भारताला विजयासाठी 407 रनची गरज आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) खेळणार का नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

सिडनी, 10 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सिडनीमध्ये तिसरी टेस्ट मॅच सुरू आहे. या मॅचमध्ये भारताला विजयासाठी 407 रनची गरज आहे. एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला मोठा धक्का लागला आहे. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरणार नाही. तर ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या कोपराला झालेली दुखापत फार गंभीर नाही, पण त्याला अजूनही दुखत आहे, त्यामुळे उपचार सुरू आहेत. चौथ्या इनिंगमध्ये ऋषभ पंत बॅटिंग करू शकतो.

सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बॅटिंग करत असताना पंतच्या कोपराला दुखापत झाली. पॅट कमिन्सच्या बॉलिंगवर पूल शॉट मारताना पंतच्या कोपराला बॉल लागला. यानंतर टीम इंडियाच्या फिजियोने पंतवर उपचार केले आणि तो पुन्हा बॅटिंग करायला लागला. या दुखापतीनंतर पंत जास्त काळ मैदानात टिकला नाही. जॉश हेजलवूडच्या बॉलिंगवर पंतची विकेट गेली. 67 बॉलमध्ये 36 रन करून पंत माघारी परतला. आयसीसीच्या नियमांमुळे भारताने ऋषभ पंतऐवजी ऋद्धीमान साहा विकेट कीपिंगसाठी मैदानात उतरला.

जडेजा सीरिजमधून बाहेर

डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे ऑलराऊंडर रविंद्र जडेजा सीरिजमधून बाहेर झाला आहे. तिसऱ्या दिवशी बॅटिंग करत असताना मिचेल स्टार्कने टाकलेला बॉल जडेजाच्या अंगठ्याला लागला. स्कॅनिंग केलं असता जडेजाची दुखापत गंभीर असल्याचं समोर आलं. अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे तो उरलेल्या सीरिजमध्ये खेळू शकणार नाही. बोटाला फ्रॅक्चर असल्यामुळे जडेजाला हातात ग्लोव्ह्ज घालता येणार नाहीत, तसंच त्याला बॅटही पकडता येत नाहीये. जडेजाला या दुखापतीतून सावरण्यासाठी कमीतकमी दोन ते तीन आठवडे लागतील, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

जडेजाचं नसणं टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. कारण या दौऱ्यात जडेजा शानदार फॉर्ममध्ये होता. दुसऱ्या टेस्टमध्ये सातव्या क्रमांकावर जडेजाने महत्त्वाचं अर्धशतक केलं होतं. तर या मॅचमध्ये त्याने 4 विकेट घेतल्या आणि स्टीव्ह स्मिथला डायरेक्ट हिट करून रन आऊटही केलं, याशिवाय बॅटिंगमध्ये त्याने नाबाद 28 रन केले होते.

First published: