सिडनी, 9 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनीमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताची (India vs Australia) पहिली इनिंग 244 रनवर संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 338 रन केल्यामुळे त्यांना 94 रनची आघाडी मिळाली आहे. भारताने तिसऱ्या दिवसाची सुरूवात 96-2 अशी केली होती. यानंतर चहापर्यंत भारताची संपूर्ण टीम 244 रनवर ऑल आऊट झाली. या इनिंगमध्ये भारताचे तीन बॅट्समन रन आऊट (Run Out) झाले. पहिल्या इनिंगमध्ये तीन रन आऊट व्हायची भारतासाठी ही पहिलीच वेळ होती. टेस्ट मॅचमध्ये भारताचे तीन रन आऊट याआधी 12 वर्षांपूर्वी झाले होते.
सिडनी टेस्टमध्ये हनुमा विहारी 4 रन करून आऊट झाला. विहारीने मिड ऑफच्या दिशेने बॉल मारला आणि गरज नसताना तो धावला आणि यामध्ये तो रन आऊट झाला. जॉस हेजलवूडने डायरेक्ट हिट करून विहारीला माघारी पाठवलं. दिवसाचा दुसरा रन आऊट आर.अश्विनच्या रुपात झाला. जडेजाने कव्हर्सच्या दिशेने बॉल मारला आणि दोघं रनसाठी धावले. जडेजाने धावताना चपळता दाखवली पण अश्विनला मात्र अशी चपळता दाखवता आली नाही, त्यामुळे 10 रनवर तो माघारी गेला. यानंतर दुसरी रन घेण्याच्या जडेजाच्या चुकीमुळे बुमराहदेखील रन आऊट झाला. मार्नस लाबुशेनच्या डायरेक्ट हिटवर बुमराहला त्याची विकेट गमवावी लागली.
याआधी 2008 साली इंग्लंडविरुद्ध वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि युवराज सिंग रन आऊट झाले होते. सेहवागला 17 रनवर आणि युवराज सिंगला 86 रनवर इयन बेलने डायरेक्ट हिट करून रन आऊट केलं. तर एन्ड्र्यू फ्लिन्टॉफच्या थ्रोमुळे लक्ष्मणही आऊट झाला होता. या तीन रन आऊटनंतरही भारतीय टीम ती मॅच ड्रॉ करण्यात यशस्वी ठरली होती.
19 ते 23 डिसेंबर 2008
भारत विरुद्ध इंग्लंड
भारताची पहिली इनिंग : 453
इंग्लंडची पहिली इनिंग : 302
भारताची दुसरी इनिंग : 251/7 घोषित
इंग्लंडची दुसरी इनिंग : 64-1
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.