मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : दिवसाच्या शेवटी रोहित शर्माने केली मोठी चूक, भारताला महागात पडणार!

IND vs AUS : दिवसाच्या शेवटी रोहित शर्माने केली मोठी चूक, भारताला महागात पडणार!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय (India vs Australia) ओपनर पुन्हा एकदा चांगल्या सुरूवातीनंतर अपयशी ठरले. पहिल्या इनिंगमध्ये भारताला 70 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून देणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये 71 रनची पार्टनरशीप केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

सिडनी, 10 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय (India vs Australia) ओपनर पुन्हा एकदा चांगल्या सुरूवातीनंतर अपयशी ठरले. पहिल्या इनिंगमध्ये भारताला 70 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून देणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये 71 रनची पार्टनरशीप केली. शुभमन गिल 31 रनवर आऊट झाला, तर रोहित शर्माने अर्धशतक केलं. पण रोहित शर्माने दिवसाच्या शेवटी केलेली चूक भारताला महागात पडली. पॅट कमिन्सने टाकलेल्या शॉर्ट पिच बॉलवर रोहित शर्मा हूक मारायला गेला, पण बाऊंड्री लाईनवर असलेल्या मिचेल स्टार्कने त्याचा कॅच पकडला.

दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या 4 ओव्हर बाकी असताना रोहित शर्माने त्याची विकेट दिली. एवढ्या कमी ओव्हरचा खेळ बाकी असताना आणि मॅचच्या शेवटच्या दिवशी टीमपुढे मोठे आव्हान असताना रोहितने या शॉट खेळणं टाळायला पाहिजे होतं, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. 98 बॉलमध्ये 52 रन करून रोहित शर्मा आऊट झाला.

दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 98-2 एवढा झाला आहे. चेतेश्वर पुजारा 9 रनवर आणि अजिंक्य रहाणे 4 रनवर नाबाद खेळत आहेत. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 309 रनची गरज आहे.

आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा या दौऱ्यातल्या वनडे, टी-20 सीरिज आणि पहिल्या दोन टेस्टला मुकला होता. यानंतर तिसऱ्या टेस्टसाठी त्याचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं. पहिल्या इनिंगमध्ये 26 रन करून रोहित शर्मा आऊट झाला होता.

First published: