मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : जडेजाचा डायरेक्ट हिट, स्मिथ थेट पॅव्हेलियनमध्ये, पाहा जबरदस्त VIDEO

IND vs AUS : जडेजाचा डायरेक्ट हिट, स्मिथ थेट पॅव्हेलियनमध्ये, पाहा जबरदस्त VIDEO

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनीमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने अष्टपैलू कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट घेण्याबरोबरच जडेजाने डायरेक्ट हिट थ्रो करत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

पुढे वाचा ...

सिडनी, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनीमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने अष्टपैलू कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट घेण्याबरोबरच जडेजाने डायरेक्ट हिट थ्रो करत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तिसऱ्या टेस्टमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा भारताने 338 रनवर ऑल आऊट झाला. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 131 रनची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाच्या 9 विकेट गेल्यानंतर स्वत:कडेच स्ट्राईक ठेवण्याच्या नादात स्मिथ दुसऱ्या रनसाठी धावला. पण डीप स्क्वेअर लेगला उभा असलेला जडेजा प्रचंड वेगाने धावत आला आणि त्याने त्याच वेगाने थ्रोही केला. जडेजाचा हा थ्रो थेट स्टम्पवर जाऊन आदळला आणि स्मिथची खेळी संपुष्टात आली. जडेजाच्या या थ्रोचं क्रिकेट समिक्षक आणि चाहते कौतुक करत आहेत.

पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये फक्त 10 रन करणाऱ्या स्मिथला अखेर या मॅचमध्ये सूर गवसला. स्मिथने त्याच्या टेस्ट कारकिर्दीतलं 27 वं शतक झळकावलं. 226 बॉलमध्ये त्याने 131 रनची खेळी केली, ज्यात 16 फोरचा समावेश होता. भारताविरुद्ध 25 इनिंगमध्ये त्याचं हे 8 वं शतक होतं. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर स्मिथने तीन वर्षांनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावलं.

First published: