सिडनी, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने पुन्हा एकदा त्याच्या टीकाकारांचं तोंड बंद केलं आहे. सिडनीमधल्या तिसऱ्या टेस्टमध्ये जडेजाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट घेतल्या, याचसोबत त्याने स्टीव्ह स्मिथला डायरेक्ट हिट मारून रन आऊटही केलं. जडेजाच्या या कामगिरीचं भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी कौतुक केलं आहे. संजय मांजरेकर आणि रविंद्र जडेजा या दोघांमध्ये झालेला वाद सर्वश्रुत आहे. मांजरेकर यांनी केलेल्या टीकेला जडेजा याने सोशल मीडियावरून प्रत्युत्तरही दिलं होतं.
जडेजाने डायरेक्ट हिट करून स्मिथला रन आऊट केल्यानंतर मांजरेकर यांनी ट्विट केलं. 'अशक्य असं हे काम फक्त जडेजासारखा फिल्डरच करू शकतो. फक्च अचूकता नाही तर थ्रोचा वेगही स्मिथला रन आऊट करण्यासाठी महत्त्वाचा होता. सर्वोत्कृष्ट', असं ट्विट मांजरेकर यांनी केलं आहे.
Seemingly impossible that only Jadeja the fielder could have made possible. Not just the accuracy of the throw but the sheer speed of the throw was the key to that run out. Absolutely brilliant!
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) January 8, 2021
That was absolutely ridiculous throw jaddu @imjadeja you can throw rockets with your hands . Take a bow sir jadeja incredible stuff out there . #AUSvIND pic.twitter.com/f9ziV2hXkp
— Ronakk Patel (@PatelRon9) January 8, 2021
Just King Jadeja things #INDvsAUS pic.twitter.com/uFbZ4Xewsi
— Ayush (@TangledWithYou_) January 8, 2021
2019 सालच्या वर्ल्ड कपमध्ये मांजरेकर यांनी जडेजाचा उल्लेख कामचलाऊ खेळाडू, जो थोडी बॉलिंग आणि थोडी बॅटिंग करू शकतो, असा केला होता. जडेजासारख्या कामचलाऊ खेळाडूऐवजी एखाद्या स्पेशलिस्ट खेळाडूला संधी द्यावी, असं मत मांजरेकर यांनी मांडलं होतं. यानंतर जडेजा संतापला होता. 'मी संजय मांजरेकर यांच्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मॅच खेळलो आहे. त्यामुळे मांजरेकरांनी आपल्याबद्दल असं वक्तव्य करू नये,' अशी प्रतिक्रिया जडेजाने दिली होती. हा वाद वाढल्यानंतर मांजरेकर यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.