सिडनी, 6 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची (India vs Australia) घोषणा करण्यात आली आहे. मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याच्याऐवजी रोहित शर्मा (Rohit Sharma) चं टीममध्ये पुनरागमन झालं आहे, तर उमेश यादव (Umesh Yadav) याच्याऐवजी नवदीप सैनी (Navdeep Saini) ला संधी मिळाली आहे. नवदीप सैनीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे पदार्पण असेल. दुसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान उमेश यादव याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर झाला होता. तर मयंक अगरवाल याला पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये संघर्ष करावा लागला होता. त्यातच रोहित शर्मा फिट झाल्यामुळे त्याला मयंकच्या जागी टीममध्ये स्थान मिळालं.
मयंकच्याऐवजी रोहित टीममध्ये आल्यामुळे तोच ओपनिंगला खेळेल, हे जवळपास निश्चित झालं आहे. आधी हनुमा विहारीला काढून रोहितला मधल्या फळीत खेळवलं जाईल, कारण तो बऱ्याच कालावधीनंतर टेस्ट क्रिकेट खेळत आहे, अशी चर्चा सुरू होती, पण या सगळ्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये मानहानीकारक पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने धडाकेबाज पुनरागमन केलं. अजिंक्य रहाणेची शतकी खेळी आणि भारतीय बॉलरच्या आक्रमक कामगिरीमुळे भारताने ही टेस्ट मॅच 8 विकेटने जिंकली. 4 टेस्ट मॅचची ही सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.
भारतीय टीम
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.