सिडनी, 8 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सिडनीमध्ये तिसरी टेस्ट सुरू आहे. या मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याने भारताचे ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांना छेडलं. तुझा आवडता खेळाडू कोण आहे, सचिन का विराट? असा प्रश्न लाबुशेनने शुभमन गिलला विचारला, तर क्वारंटाईनमध्ये काय केलंस? असं लाबुशेनने रोहितला विचारलं. लाबुशेनने केलेलं हे स्लेजिंग स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं.
विराट का सचिन, आवडता खेळाडू कोण? लाबुशेनच्या या प्रश्नाला गिलने मॅच संपल्यानंतर सांगतो, असं उत्तर दिलं. रोहित शर्मा याने मात्र लाबुशेनच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत. सिडनी टेस्टमध्ये खेळण्याआधी रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात 14 दिवस क्वारंटाईन होता.
शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी भारताला 70 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. गिलने 101 बॉलमध्ये 8 फोरच्या मदतीने 50 रन केले, तर रोहित शर्मा 26 रन करून आऊट झाला.
.@marnus3cricket was enjoying being back under the helmet for the Aussies! #AUSvIND pic.twitter.com/GaCWPkTthl
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
ऑस्ट्रेलियाने केले 338 रन
स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 338 रन केले. स्मिथने 226 बॉलचा सामना करून 131 रनची खेळी केली, यात त्याने 16 फोर लगावले. याशिवाय मार्नस लाबुशेनने 91 रन आणि आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या विल पुकोवस्कीने 62 रनची खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर बुमराह आणि नवदीप सैनीला प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं. रविंद्र जडेजाने जबरदस्त डायरेक्ट हिट करून स्मिथला रन आऊट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.