मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : सिराजसोबत गैरवर्तन, हरभजनला आठवला 'इतिहास'

IND vs AUS : सिराजसोबत गैरवर्तन, हरभजनला आठवला 'इतिहास'

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सिडनीमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या मॅचदरम्यान मोठा वाद झाला. वर्णद्वेषी टिप्पणीच्या या वादावर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Shreyas

सिडनी, 10 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सिडनीमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या मॅचदरम्यान मोठा वाद झाला. स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी मोहम्मद सिराजला उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी केली. यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ काही काळ थांबवण्यात आला होता. त्याआधी तिसऱ्या दिवशीही सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागला, यानंतर भारतीय टीमने क्रिकेट ऑस्ट्रेलिया, अंपायर आणि मॅच रेफ्री यांच्याकडे तक्रार केली.

वर्णद्वेषी टिप्पणीच्या या वादावर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने प्रतिक्रिया दिली आहे. प्रेक्षकांच्या या वागणुकीवर हरभजनने नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियात माझ्यासोबतही अशाच प्रकारच्या घटना घडल्याचं हरभजन म्हणाला. 'मीदेखील ऑस्ट्रेलियात खेळताना मैदानात अनेक वैयक्तिक गोष्टी ऐकला. त्यांनी माझा वर्ण आणि माझ्या धर्मावर टिप्पणी केली होती. हे काही पहिल्यांदाच झालं नाही, जेव्हा गर्दी बकवास बडबड करते. त्यांना कसं रोखायचं?' असा प्रश्न हरभजनने विचारला.

या प्रकरणावरून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाची माफी मागितली आहे. 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया या घटनेचा कठोर शब्दात निषेध करते. टीम इंडियाच्या खेळाडूंची आम्ही माफी मागतो, तसंच दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू,' असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सुरक्षा प्रमुख सीन कॅरोल म्हणाले आहेत.

हरभजनप्रमाणे विराट कोहली यालाही 2013 ऑस्ट्रेलियात प्रेक्षकांच्या खराब वर्तनाचा सामना करावा लागला होता. यानंतर विराट कोहलीने प्रेक्षकांच्या दिशेने आक्षेपार्ह इशारा केला, यानंतर मॅच रेफ्रीने विराट कोहलीच्या मानधनातील 50 टक्के रक्कम कापली होती.

First published: