सिडनी, 9 जानेवारी : स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) सावरलं आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दोन्ही ओपनर लवकर आऊट झाल्यानंतर स्मिथ (Steve Smith) आणि लाबुशेन (Marnus Labuschagne) यांनी नाबाद 68 रनची महत्त्वाची पार्टनरशीप केली, त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 103-2 एवढा झाला आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आघाडी 197 रनपर्यंत गेली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये डेव्हिड वॉर्नर 13 रनवर आणि विल पुकोवस्की 10 रनवर आऊट झाले. भारताकडून अश्विन आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
त्याआधी भारताची (India vs Australia) बॅटिंग पुन्हा गडगडली आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 244 रनवर ऑल आऊट झाला आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 94 रनची आघाडी मिळाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताचे तब्बल तीन खेळाडू रन आऊट झाले. हनुमा विहारी, आर.अश्विन आणि जसप्रीत बुमराह रन आऊट होऊन माघारी परतले. तर पॅट कमिन्सने 4 विकेट घेतल्या, जॉश हेजलवूडला 2 आणि मिचेल स्टार्कला एक विकेट मिळाली. भारताकडून शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा 50 रन करून आऊट झाले. तर ऋषभ पंतने 36 रनची खेळी केली. रविंद्र जडेजा 28 रनवर नाबाद राहिला. रोहित शर्माने 26 आणि अजिंक्य रहाणेने 22 रन केले.
मॅचच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरूवात करून दिली होती. दुसऱ्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर 96-2 एवढा होता.
लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा
तिसऱ्या दिवसाची सुरूवात भारताने 96-2 अशी केली होती. मॅचच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 338 रन केले. स्मिथचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 27 वे तर भारताविरुद्ध 8वं टेस्ट शतक आहे. लाबुशेन याने 91 रनची आणि आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या विल पुकोवस्कीने 62 रनची खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह-नवदीप सैनी यांना प्रत्येकी 2-2 तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली. 131 रनची खेळी करून स्टीव्ह स्मिथ रन आऊट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.