सिडनी, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारताने (India vs Australia) चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा 338 रनवर ऑल आऊट केल्यानंतर दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताने दोन्ही ओपनर गमावले. शुभमन गिल (Shubhaman Gill) याने टेस्ट क्रिकेटमधलं त्याचं पहिलं अर्धशतक झळकावलं. 101 बॉलमध्ये त्याने 50 रन केले. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) 26 रन करून आऊट झाला. पॅट कमिन्सने शुभमन गिलला तर जॉश हेजलवूडने रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 96/2 असा झाला आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 9 रनवर तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 5 रनवर नाबाद आहे. भारत अजूनही 242 रनने पिछाडीवर आहे.
त्याआधी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 338 रन केले. स्मिथचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 27 वे तर भारताविरुद्ध 8वं टेस्ट शतक आहे. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह-नवदीप सैनी यांना प्रत्येकी 2-2 तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली. 131 रनची खेळी करून स्टीव्ह स्मिथ रन आऊट झाला.
लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा
त्याआधी पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 166-2 एवढा स्कोअर केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा डेव्हिड वॉर्नर स्वस्तात आऊट झाला. तर आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या विल पुकोवस्कीने अर्धशतकी खेळी केली. 62 रन करून पुकोवस्की आऊट झाला.
भारताकडून रोहित शर्माचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे, तर नवदीप सैनी पहिलीच टेस्ट मॅच खेळत आहे. चार टेस्ट मॅचच्या या सीरिजची पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाने तर दुसरी टेस्ट भारताने जिंकली. त्यामुळे सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. ही मॅच जिंकून सीरिजमध्ये आघाडी घेण्याचं आव्हान दोन्ही टीमपुढे आहे.
भारतीय टीम
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी
ऑस्ट्रेलियन टीम
डेव्हिड वॉर्नर, विल पुकोवस्की, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरून ग्रीन, टीम पेन, पॅट कमिन्स, जॉस हेजलवूड, मिचेल स्टार्क, नॅथन लायन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.