मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागितली टीम इंडियाची माफी

IND vs AUS : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागितली टीम इंडियाची माफी

नटराजन आणि सुंदर हे दोघं टेस्टच्या एका इनिंगमध्ये तीन विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या दोघांनी त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहेत हा विक्रम आहे.

नटराजन आणि सुंदर हे दोघं टेस्टच्या एका इनिंगमध्ये तीन विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या दोघांनी त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहेत हा विक्रम आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या (India vs Australia) चौथ्या दिवशीही भारतीय खेळाडूंबाबत स्टेडियममधून प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia Apology) ने टीम इंडियाची माफी मागितली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

सिडनी, 10 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या (India vs Australia) चौथ्या दिवशीही भारतीय खेळाडूंबाबत स्टेडियममधून प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia Apology) ने टीम इंडियाची माफी मागितली आहे. 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया या घटनेचा कठोर शब्दात निषेध करते. टीम इंडियाच्या खेळाडूंची आम्ही माफी मागतो, तसंच दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू,' असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सुरक्षा प्रमुख सीन कॅरोल म्हणाले आहेत.

चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कॅमरून ग्रीनने मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ला दोन सिक्स मारले. ओव्हर संपल्यानंतर सिराज स्क्वेअर लेगच्या सीमारेषेवर फिल्डिंग करत होता, त्यावेळी प्रेक्षकांमधून वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आल्याची तक्रार त्याने केली. यानंतर काही काळ खेळ थांबवण्यात आला. यानतंर सिराज आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी मैदानातल्या दोन्ही अंपायरशी चर्चा केली. प्रेक्षकांमधल्या कोणत्या समुहाकडून ही टिप्पणी करण्यात आल्याचंही सिराजने सांगितलं, यानंतर पोलिसही यामध्ये पडले. पोलिसांनी या समुहाला स्टेडियम सोडून जायला सांगितलं, यानंतर खेळाला सुरूवात झाली.

आयसीसीही खेळाडूंवर वर्णद्वेषी टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाईच्या तयारीत आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार मैदानात 800 कॅमेरा लावण्यात आले आहेत, तसंच कोरोना व्हायरसमुळे मैदानात मॅच पाहायला आलेल्या सगळ्या 10 हजार प्रेक्षकांची माहिती यंत्रणांना आहे, त्यामुळे टिप्पणी करणाऱ्यांना पकडणं सोपं जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

मॅचच्या तिसऱ्या दिवशीही मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह याच्यावर प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. यानंतर भारतीय टीमने याची अधिकृत तक्रार क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसीकडे केली. या प्रकरणावर बीसीसीआयनेही नाराजी जाहीर केली. अशाप्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले आहेत. 'जेन्टलमन्स गेम'मध्ये अशाप्रकारच्या व्यवहाराला थारा नाही. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माहिती घेतली आहे आणि ते संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील, अशी प्रतिक्रिया राजीव शुक्ला यांनी दिली.

First published: