सिडनी, 9 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या (India vs Australia) पहिल्या इनिंगमध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने अर्धशतक केलं. भारताच्या 142 रनवर 4 विकेट गेल्यानंतर पुजाराने ऋषभ पंत (Rishabh Pant) सोबत अर्धशतकीय पार्टनरशीप करत भारताचा डाव सावरला. पण चेतेश्वर पुजाराचं टेस्ट क्रिकेटमधलं हे सगळ्यात संथ अर्धशतक होतं. पुजाराने 174 बॉल खेळून 50 रन केले. पुजाराचं हे जरी सगळ्यात संथ शतक असलं, तरी त्याचं मैदानात टिकणं भारतासाठी तितकचं महत्त्वाचं होतं.
50 रन केल्यानंतर चेतेश्वर पुजारा पॅट कमिन्सच्या बॉलिंगवर आऊट झाला. कमिन्सने 89 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला टीम पेनला कॅच आऊट केलं. पुजाराने 176 बॉलमध्ये 28.41 च्या सरासरीने 50 रन केले, यामध्ये त्याने 5 फोर मारले. पुजाराने त्याच्या या खेळीमध्ये 100 बॉल खेळल्यानंतर पहिली फोर मारली.
पुजाराने 100 बॉलमध्ये फक्त 16 रन केले होते, यानंतर मात्र त्याने पुढच्याच ओव्हरला दोन फोर मारले. 62व्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आलेल्या नॅथन लायनचं पुजाराने फोर मारून स्वागत केलं. 100 बॉल खेळल्यानंतर पुजाराची ही पहिली फोर होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.