मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : संथ खेळीवरून टीकेची झोड, पुजाराने दिलं प्रत्युत्तर

IND vs AUS : संथ खेळीवरून टीकेची झोड, पुजाराने दिलं प्रत्युत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी गरजेपेक्षा जास्त सावध खेळ केल्यामुळे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) वर टीकेची झोड उठली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी गरजेपेक्षा जास्त सावध खेळ केल्यामुळे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) वर टीकेची झोड उठली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी गरजेपेक्षा जास्त सावध खेळ केल्यामुळे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) वर टीकेची झोड उठली आहे.

  • Published by:  Shreyas

सिडनी, 10 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी गरजेपेक्षा जास्त सावध खेळ केल्यामुळे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) वर टीकेची झोड उठली आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसोबतच ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू ऍलन बॉर्डर आणि रिकी पॉण्टिंग यांनीही पुजाराच्या बॅटिंगवर निशाणा साधला आहे. या सगळ्या टीकेला खुद्द पुजाराने प्रत्युत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीमने शानदार बॉलिंग केल्यामुळे आपण अशी बॅटिंग केल्याचं पुजारा म्हणाला आहे. पुजाराचं टेस्ट क्रिकेटमधलं हे सगळ्यात संथ अर्धशतक होतं. 176 बॉलमध्ये 50 रन करून पुजारा आऊट झाला.

'मी चांगली बॅटिंग करत होतो, पण उत्कृष्ट बॉलवर आऊट झालो. मी जे करत होतो, त्यापेक्षा आणखी चांगल करू शकत नव्हतो. मला फक्त बॅटिंग करायची आहे, जे मला माहिती आहे,' असं पुजारा म्हणाला.

'पॅट कमिन्सचा तो सीरिजमधला सगळ्यात उत्तम बॉल होता, त्या बॉलवर मला काहीही करता आलं नसतं. पॅट कमिन्सच्या बॉलिंगचा सामना करणं कठीण असतं. तो सीरिजचा सर्वोत्कृष्ट बॉल होता. जास्त बाऊन्समुळे मला तो बॉल खेळावा लागला. जेव्हा तुमचा दिवस चांगला नसतो, तेव्हा वाचण्याची शक्यताही कमी असते,' अशी प्रतिक्रिया पुजाराने दिली.

'या टेस्टमध्ये दोन्ही टीममध्ये अनुभवी बॉलरचा फरक आहे. आमच्या फास्ट बॉलरकडे अनुभव कमी आहे, पण ते सुधारत आहेत आणि ते चांगली कामगिरी करतील. त्यांच्यासाठी ही शिकण्याची चांगली संधी आहे. ऋषभ पंतची विकेट गेल्यानंतर आम्ही अडचणीत आलो. दुसऱ्या इनिंगमध्ये आम्हाला जडेजाची कमी जाणवत आहे,' असं पुजारा म्हणाला. बॅटिंग करत असताना जडेजाच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली, त्यामुळे तो सीरिजबाहेर झाला आहे.

पुजारावर टीका

चेतेश्वर पुजारा शॉट मारायला घाबरतो, असं वाटत होतं. रन बनवण्याऐवजी तो क्रीजवर टिकून राहण्यासाठी खेळत होता, असं बॉर्डर म्हणाले. बॉर्डर फॉक्सस्पोर्ट्स.कॉम.एयू सोबत बोलत होते. या सीरिजमध्ये पुजाराने जास्त प्रभाव पाडला नाही. पुजाराने रन बनवण्यासाठी एवढा वेळ घेतला, ज्याचा परिणाम भारताच्या बॅटिंगवर झाला. ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर पुजाराने वर्चस्व दाखवलं नाही, असं वक्तव्य बॉर्डर यांनी केलं.

दुसरीकडे रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) यानेही पुजाराच्या बॅटिंगवर टीका केली आहे. पुजाराने आणखी जलद रन काढण्याची गरज होती. तो या गतीने खेळल्यामुळे इतर भारतीय बॅट्समनवर दबाव पडल्याचं मत रिकी पॉण्टिंगने मांडलं.

First published: